समांतर क्रांती / खानापूर
खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी आज मंगळवारी (ता.७) खानापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी येथील शासकीय विश्रामधामात भाजप नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी माजी आमदार अरविंद पाटील यांनी खासदार हेगडे-कागेरी यांच्याकडे तालुक्यातील विविध समस्या मांडल्या. तसेच ग्रामिण भागातून आलेल्या नागरीकांची कैफीयत मांडून त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत विनंती केली.
खानापूर तालुक्यातील दुर्गम खेड्यातील रस्त्यांच्या समस्या तीव्र बनत चालल्या आहेत. यंदा विविध गावांच्या महालक्ष्मी यात्रा आहेत. त्या गावांना अधिकाधिक निधी देण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार अरविंद पाटील यांनी यावेळी केली. तालुक्यातील समस्या सोडविण्याबाबत आपण सकारात्मक असून केंद्राकडून आवश्यक निधी मंजुरीसाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी खासदार हेगडे-कागेरी यांनी सांगितले.
फोटोसाठी कांही पण.. हुल्लडबाजीचा कळसच..!
समांतर क्रांती / प्रासंगिक खानापूर तालुका हा दाट जंगलाने व्यापलेला आहे. आवघ्या तालुक्यात वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. जेवढे वन्य प्राणी आहेत, कमी-अधिक तेवढे वन्यप्राणीदेखील आहेत. साहजिकच अनेकवेळा माणूस आणि वन्यप्राण्यातील संघर्ष हा पाचविला पुजला आहे. पण, स्वत:हून वन्य प्राण्यांचे संकट ओढवून घेणाऱ्यांची किव करावी, अशी सद्यस्थिती आहे. दिवसाढवळ्या जनवस्तीजवळ, रानवाटेवर मुक्त संचार करणाऱ्या हत्ती, वाघ, बिबटे, […]