समांतर क्रांती / खानापूर
येथील मासळी बाजारात आज रविवारी (ता. ५) सकाळी ६२ किलो वजनाचा छत्री मासा (स्वॉर्डफिश) दाखल झाला. हा मासा विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. मासळी विक्रेते रोहित पोळ यांच्या दुकानात हा मासा आल्याचे समजताच त्याला बघण्यासाठी खवय्यांनी सकाळपासून एकच गर्दी केली आहे. गोव्यातील वास्को समुद्रात काल शनिवारी हा मासा आढळून आला. आज पहाटे तो खानापुरातील मासळी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला.स्वॉर्डफिश हा एक मासा आहे जो उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण झोनच्या महासागरात राहतो. तलवारीच्या आकाराची लांबलचक थुंकी, पाठीवर उंच पंख, दात नसलेले तोंड आणि अंगावर खवले नसणे ही या माशाची वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत.
भाजप नेते संजय कुबल यांना पितृशोक
समांतर क्रांती / खानापूर भाजपचे खानापूर तालुका माजी अध्यक्ष संजय कुबल यांचे वडील जयवंत कुबल यांचे आज रविवारी (ता.५) वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, मुलगी, नातवंड-पणतवंडे असा परिवार आहे. एक मितभाषी बेकरी व्यवसायीक म्हूणन जयंवत कुबल हे खानापूर शहरात परिचीत होते. येथील मोक्षधामात त्यांच्यावर रात्री ८.३० वाजता अंत्यसंस्कार होणार […]