जांबोटी: बेळगाव-पणजी मार्गावरील कणकुंबी तपासणी नाक्यावर पाच लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एसएसटी पथकाने ही कारवाई केली. Five lakh cash seized in ‘Kankumbi’
याबाबतची अधिक माहिती अशी, शनिवारी रात्री पणजीहून हैदराबादकडे बस निघाली होती. कणकुंबी नाक्यावर तैनात असलेले एसएसटी अधिकारी मलगौडा पाटील व पोलिस कर्मचाऱ्यांनी सदर बसची तपासणी केली असता सिध्दभट साईभास्कर रेड्डी (रा. विकाराबाद, आंध्रप्रदेश) यांच्याकडे पाच लाखांची रोकड सापडली. त्याची कोणतीच कागदपत्रे नसल्याने सदर रक्कम जप्त करून खानापूर येथील कोषागारात ठेवण्यात आली आहे.
या घटनेची नोंद करून खानापूरचे सहाय्यक निवडणूक अधिकारी बलराम चव्हाण यांना याची कल्पना देण्यात आली. त्यांनी यासंबंधीचा अहवाल जिल्हा आचारसंहिता समिती अध्यक्ष- जि.पं. कार्यकारी अधिकारी राहूल शिंदे यांना सुपूर्द केला आहे. अधिक तपास सुरू आहे.
खानापूरकरांनो, थोडी तरी लाज बाळगा !
विशेष संपादकीय उचलली जीभ लावली टाळ्याला ही म्हण भाजपच्या नेत्यांसाठीच अस्तित्वात आली असावी, याबद्दल हल्ली कुणालाच शंका वाटत नाही. खोटारडेपणा आणि आपमतलबी वर्तणुकीसाठी सरावलेल्या भाजप नेत्यांकडून बेताल वक्तव्य केली जाणे ही कांही नवी बाब नाही. जुन्या बाटलीत जुनी अशी त्यांची आवस्था आहे. दहा वर्षे केंद्रात सत्ता असतांनाही आताच्या लोकसभा निवडणुकीत ‘अंधभक्त’ हिंदू खतरेमें है’ची ओरड […]