समांतर क्रांती / खानापूर
माण (ता. खानापूर) येथील शेतकरी सखाराम महादेव गावकर (वय ६७) यांच्यावर शेतवडीत काम करीत असतांना दि. २ रोजी हल्ला केला होता. त्यांच्यावर बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांचा एक पाय निकामी झाला आहे. त्यांच्या उपचारासाठी लाखोंचा खर्च होत असतांना वनखात्याकडून त्यांना केवळ ४० हजार देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील उपचारात व्यत्यय येत असून त्यांची स्थिती बिकट बनली आहे. सध्या गावातील नागरीकांनी घरा-घरातून पैसे जमवून उपचार चालविला आहे.
वनखात्याकडून अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याला अद्याप आर्थिक मदत दिली गेलेली नाही. जे ४० हजार रूपये देण्यात आले आहेत, तेदेखील खात्याकडून मदतीचा धनादेश मिळाल्यानंतर परत करण्याची हमी रुग्णाच्या कुटुंबीयांकडून घेण्यात आली आहे. या प्रकाराबाबत कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे सदस्य महादेव कोळी यांनी संताप व्यक्त करीत येत्या दोन दिवसात मुबलक भरपाई न दिल्यास वनखात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
जंगली प्राण्यांची शिकार केल्यास वनखात्याकडून तात्काळ कारवाई केली जाते. पण, जंगली प्राण्यांनी हल्ला केल्यानंतर मात्र वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडून जखमींकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या प्रकाराने पश्चिम भागातील नागरीक त्रस्त झाले आहेत. माण येथील जखमी सखाराम यांना वनखात्याच्या या वेळकाढू वृत्तीचा फटका बसला आहे. आधी गरीब असलेल्या गावकर कुटुंबीयांना उपचारासाठी पैसे जमविणे अवघड झाले आहे. नुकताच ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी यांनी मदतीचा हात पुढे केला.
वनखात्यांने तात्काळ जखमी सखाराम यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अन्यथा खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा श्री. कोळी यांनी दिला आहे.
वनखात्याने तालुक्यात अंधाधुंदी चालविली आहे. जखमींना मदत देण्यात जाणिवपूर्वक दिरंगाई केली जात आहे. लोकप्रतिनिधी सुध्दा याकडे दुर्लक्ष करीत आहेत. गैरव्यवहारात वनखाते त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालते. पण, जंगली प्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना आणि हल्ल्यात पाळीव जनावरे मृत झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात मात्र येथील अधिकारी कुचराई करीत आहेत.
- ॲड. ईश्वर घाडी, अध्यक्ष ब्लॉक काँग्रेस
‘पुष्पा’ची रवानगी जेलमध्ये
हैदराबाद: सध्या पुष्पा २ हा चित्रपट दररोज बॉक्स ऑफीसवर नवनवे विक्रमी नोंदवीत आहे. या चित्रपटाचा नायक पुष्पा अर्थात तेलगू सुपरस्टार अल्लुअर्जूनला दुपारी पोलीसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. #pushpa-2 #Court Custody to Allu Arjun ४ डिसेंबर रोजी पुष्पा २ या चित्रपटाचा प्रिमीयर शो संध्या […]