समांतर क्रांती / बंगळूर
कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री एस.एम.कृष्णा (सोमनहळ्ळी मल्लय्या कृष्णा) यांचे मध्यरात्री २.४५ वाजता निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी बंगळूर येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. गेल्या कांही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. Former Chief Minister S.M. Krishna passes away.
कॉग्रेसमधून राज्याचे मुख्यमंत्री झालेले एस.एम.कृष्णा यांनी २०१७ मध्ये भाजपात प्रवेश केला होता. तेव्हापासून ते सक्रीय राजकारणापासून दूर गेले होते. सुमारे सहा दशके ते राजकारणात होते. दरम्यान त्यांनी आमदार, खासदार, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि राज्यपाल अशी पदे त्यांनी भुषविली. १९९९ ते २००४ पर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांना २०२३ साली पद्मविभूषण देऊन सन्मानीत करण्यात आले होते. त्यांच्या जाण्याने कर्नाटकाच्या राजकीय क्षेत्राने एक अनुभवी राजकारणी हरविला आहे.
रुमेवाडी क्रॉसजवळ कार पलटी
समांतर क्रांती / खानापूर खानापूरहून करंबळकडे जाणारी कार पलटी झाल्याने चालकासह दोघे जखमी झाल्याची घटना घडली.चालकाच्या अतिघाईमुळे हा अपघात घडल्याचे समजते. केवळ सुदैवाने या अपघातात मोठी हानी टळली. या अपघातात चालक लोकेश तुकाराम भेकणे याची उजवी मांडी कापली आहे, तर प्रवासी राम नागेंद्र चोपडे हा किरकोळ जखमी झाला आहे. दोघांवर खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार […]