
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर
Former District Collector Coutinho passes away; What is the Khanapur connection? बेळगावचे माजी जिल्हाधिकारी बी.ए. कुटिन्हो यांचे काल गुरूवारी (ता.१६) निधन झाले. कुतिन्हो हे कडक शिस्तीचे जिल्हाधिकारी म्हणून परिचीत होते. १६ मे १९८५ ते २३ मे १९८७ असा दोन वर्षांचा काळ ते बेळगावचे ७१ वे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी या दोन वर्षांच्या काळात त्यांनी अनेक अविस्मरणीय कामगिरी केल्या. त्यातही सर्वात जास्त गाजली ती विस्थापीत गावाचे एका रात्रीत पुनर्वसन करण्याची घटना.. या घटनचे खानापूर कनेक्शन काय?
कुटिन्हो आणि खानापूर कनेक्शन..
अथणी तालुक्यातील महेशवाडी येथे १९८५ साली दंगल झाली. गुन्हेगार म्हणून कुख्यात असलेल्या तेथील कुटुंबांना अतणी तालुक्यात कुठेच स्थान राहिले नाही. त्यांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर होता. तेव्हा जिल्हाधिकारी बी.ए.कुटिन्हो यांनी त्या शेकडो कुटुंबांचे पुनर्वसन एका रात्रीत केले. खानापूर तालुक्यातील मन्सापूर येथील शासकीय जमिनीत हे नवे गाव १९८५ साली वसवले गेले. तेच हे गाव आज ‘कुटिन्हो’ नगर म्हणून परिचीत आहे. पुनर्वसनानंतर पहिल्यास दिवशी तेथील झोपड्या जळल्या. त्यामुळे दलितांची वस्ती जाळण्यात आल्याच्या अफवेने मोठी खळबळ उडाली होती. पण, हे प्रकरण बी.ए.कुटिन्हो यांनी मोठ्या शिताफीने हाताळली. आणि जातीय दंगल टाळून कायदा व सुव्यवस्था सांभाळली होती. तत्कालीन गृहमंत्री बी. राचय्या यांनी या नगराचे उद्घाटन केले व कुटिन्होनगर हे नाव दिले.
..तर खानापूरचे झाले असते नंदनवन
तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना महेशवाडीतील गुन्हेगारी जमातीच्या कुटुंबांचे पुनर्वसन केल्याच्या आरोपांचा सामना त्यावेळी करावा लागला. तेव्हा तालुक्याचे आमदार दिवंगत वसंतावर पाटील होते. त्यांनी पुनर्वसनाला विरोध केला. पण, कुटिन्हो यांनी मन्सापूरजवळ एक मोठा उद्योग स्थापित करण्याचे अश्वासन दिले आणि विरोध मावळला.
कारखाना सुरू करण्यासाठी तेव्हा २० हजार रुपये एकर अशी शेकडो एकर खासगी जमिन सुध्दा खरेदी करण्यासाठी दस्त तयार झाले होते. पण, त्याच काळात म्हणजे १९८६ चा सीमालढा तीव्र झाला अन् स्वीडनच्या कंपनीने हात वर केले. त्यानंतरही कुटिन्हो येथे बियरचा कारखाना आणण्यासाठी प्रयत्नशील होते. दरम्यानच्या काळात त्यांची बदली झाली. त्यांच्या नंतरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी फाईल बासणात गुंडाळली. आमदारांनी सुध्दा याकडे दुर्लक्ष केले आणि खानापूरचे नंदनवन होता होता राहिले…
बी.ए.कुतिन्हो हे १९७७ च्या बॅचचे कर्नाटक कॅडरचे आएएस अधिकारी होते. ते कडक शिस्तीचे होतेच, पण दूरदृष्टीचेही होते. त्यांनी महेशवाडीच्या स्थलांतरातून अथणीतील संभाव्य जातीय दंगल तर रोखलीच. झोपड्या जळाल्यानंतरची संभाव्य दंगलही थोपविली. त्यांच्या जागी अन्य एखादा अधिकारी असता तर कदाचीत हे अशक्यच होतं..

मराठी भाषिकांनी एकी जपणे हेच हुतात्म्यांना अभिवादन
समांतर क्रांती / खानापूर मराठी भाषिकांनी हेवेदावे सोडून एकत्र येणे हीच सीमालढ्यातील हुतात्म्यांना खऱ्या अर्थाने श्रध्दांजली ठरेल, असे मत मराठी नेत्यांनी व्यक्त केले. गेल्या कांही वर्षात अनेक कारणांनी मराठी भाषिक विभागला गेला आहे. त्यांना एकत्र आणण्याबरोबरच लढ्याला पुन्हा एकदा नवी उभारी देण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. येथील हुतात्मा नागाप्पा होसुरकर स्मारकासमोर सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन […]