समांतर क्रांती / खानापूर
धारवाड-पणजी महामार्गावरील चिंचेवाडी (ता.खानापूर) येथे आज मंगळवारी (ता.२१) सायंकाळी कारचा अपघात झाला असून त्यात चारजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रामनगर सरकारी रूग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारांसाठी हुबळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हुबळीहून गोव्याच्या दिशेने जाणारी कार (केए ६३ एन ३८४६) चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याशेजारील दगडांना धडकली. तेथून ही कार रस्त्यापासून दूर एका झाडीत गेली. या अपघातात नितेश नेती (३० ), मंजुनाथ पाटील (२३), यश वायंमुळे (२४) व अन्य एकजण हे जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच लोंढा पोलिस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
घटनेनंतर जखमींना तात्काळ रामनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, दोघांची प्रकृती गंभीर असल्याने सर्वांना हुबळीला हलविण्यात आले. त्यांच्यावर अधिक तपास सुरू आहेत. हे सर्वजण गोव्याला निघाले होते, असे समजते.
खानापूरच्या भूमापन सहायक संचालकपदी सुप्रिया मुंबई
समांतर क्रांती / खानापूर खानापूरच्या भूमापन सहायक संचालकपदी सुप्रिया मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या बेळगाव भूमापन विभागात अधिक्षक असून त्यांच्याकडे खानापूरचा अतिरिक्त कार्यभार असेल. येथील भूमापन सहायक संचालक ए.सी.किरणकुमार यांच्या निलंबनानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. हुळंद येथील जमिनीच्या दाखल्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी सहायक संचालक किरणकुमार यांच्यासह अन्य दोघांना निलंबीत करण्यात आले होते. पण, […]