समांतर क्रांती
मंगळवारी (ता.२४) जम्मू-काश्मिरमधील पुंछ-मेंढर परिसरात भारतीय लष्कराचे वाहन ३५० फूट दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात पाच जवान शहिद झाले. त्यात कर्नाटकातील तिघांचा समावेश आहे. तर मनिपूरमध्ये झालेल्या अन्य एका अपघातात दोन जवान शहिद झाले. त्यात चिकोडी येथील जवानाचा समावेश आहे.
शहिद झालेल्या जवानांमध्ये पंतबाळेकुंद्री बेळगाव येथील दयानंद तिरकन्नावर (४४) आणि कुप्पनवाडी- चिकोडी येथील धर्मराज सुभाष खोत (४३) यांचा तसेच कुंदापूर-उडपी येथील अनूप पुजारी (३३) व महालिंगपूर- बागलकोट येथील महेश नागाप्पा मरीगोंड (३५) यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करून या शहिद जवानांचे बलिदान वाया जाणार नाही. त्यांचे शौर्य देशवासीय कायम आठवणीत ठेवतील, असे म्हटले आहे.
निवृत्ती जवळ असतांनाच काळाचा घाला
जम्मू-काश्मिर येथील पुंछ-मेंढर या परिसरात पीओकेची गस्त घालण्यासाठी निघालेले वाहन घसरून सुमारे ३५० दरीत कोसळले. त्यात पाच जवान शहिद झाले. हे सर्व जवान मराठा रेजिमेंटचे होते. यातील सुभेदार दयानंद तिरकन्नावर हे बेळगाव तालुक्यातील पंतबाळेकुंद्री येथील होते. त्यांनी लष्करात २५ वर्षे सेवा बजावली होती. दोन वर्षांनी ते निवृत्त होणार असतांनाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
मणिपूर येथील इंफाला जिल्ह्यातील बोंबाला येथे झालेल्या अन्य एका वाहन दुर्घटनेत दोघे जवान शहिद झाले. ड्युडी संपवून परतत असतांना त्यांचे वाहन दरीत कोसळून हा अपघात घडला. त्यात दोघे ठार तर सहा जवान जखमी झाले. त्यातील चिकोडी तालुक्यातील कुप्पनवाडी येथील धर्मराज सुभाष खोत हे तीन महिन्यात निवृत्त होणार होते, पण त्यांच्यावरही काळाने घाला घातला.
बेळगाव जिल्ह्यातील दोन जवान शहिद झाल्याने जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे. दोघांचेही पार्थिव उद्या गुरूवारी (ता.२६) बेळगावात दाखल होतील.
भाजप नेते दुतोंडीच!
गावगोंधळ / सदा टिकेकर सध्या राज्यात महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि आमदार सी.टी. रवी यांच्यातील राजकीय द्वंद्वामुळे वातावरण भलतेच तापले आहे. दोन्ही बाजुंनी एकमेकावर चिखलफेक आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. नुकताच मंत्री हेब्बाळकर यांनी भाजप दुतोंडी असल्याचा आरोप केला होता. तो किती तंतोतंत खरा आहे, याचे प्रत्यंतर दोनच दिवसात खानापूर भाजपच्या […]