समांतर क्रांती / खानापूर
देवलत्ती (ता. खानापूर ) येथील महेश नारायण सिमनगौडर (वय 35) याचे अपहरण करून खूणाचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी फरार असलेल्या चार संशयित आरोपीच्या मुसक्या अवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणात संदीप लक्ष्मण चलवादी (27, रा. कग्गणगी), राघवेंद्र प्रकाश चलवादी (32, लक्केबैल), मारुती तानाजी कांबळे (28, देवराई) आणि राजशेखर शंकर हिंडलगी (39, एम. के. हुबळी ) यांना अटक करण्यात आली असून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 29 डिसेंबर रोजी महेश याला संशयित आरोपीनी शेतात जाऊन मारहाण केली. त्यानंतर त्याला दुचाकीवरून बडस येथे नेले. तेथे पुन्हा मारहाण केली. तसेच त्याच्या खूणाचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेनंतर संशयित फरार झाले होते. त्याना तात्काळ अटक करावी तसेच कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत होती. दरम्यान, रविवारी (ता. 5) त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अद्याप सहा संशयित फरारी असून त्यांचा शोध जारी आहे.
मी 2028 चा मुख्यमंत्री
रायचूर: सिद्धरामय्या हे सध्या मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच येत नाही. मला अजून वाट पाहावी लागेल, मी 2028 साठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार असल्याचे सांगितले मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.रायचूर येथे पत्रकारांशी बोलताना, कोणतीही गुप्त बैठक झाली नाही. सर्वांनी मिळून जाहीरपणे बैठक घेतली, गुप्त बैठकीचा प्रश्नच येत नाही. ती फक्त दुपारच्या जेवणाची बैठक होती. बैठकीत मुख्यमंत्री बदलाबाबत […]