समांतर क्रांती / नंदगड
तीन दिवसांपासून नंदगड येथील डॅम परिसरातील शिवारातील सुमारे १५० पोती भात आणि ऊस पीक हत्तींच्या कळपाने फस्त केल्याने शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली आहे. हत्तींच्या या हैदोसामुळे नंदगडातील शेतकरी पुरते हादरून गेले असून वनखात्याने बंदोबस्त करून हत्तींना या परिसरातून हुसकावून लावावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
मागील आठवड्यात कामतगा-भालके परिसरात ठाण मांडलेल्या हत्तींनी कांही दिवसांपूर्वी गुंजीतून माणिकवाडीत घुसखोरी केली होती. तेथून हा कळप सावरगाळी आणि नायकोल परिसरात दाखल झाला होता. चार दिवसांपूर्वी या पाच हत्तींच्या कळपाने आनंदगडाला वळसा घालून नंदगड येथील डॅम परिसरात तळ ठोकला आहे. मुबलक पाणी आणि पीकांमुळे हा कळप तेथून हलायला तयार नाही.
दरम्यान, तीन दिवसांत हत्तींच्या कळपाने लाखो रुपयांच्या पिकांचे नुकसान केले आहे. जोतिबा वांद्रे यांचे सुमारे १०० पोती तर तुकाराम गावडे यांच्या २५ पोती भाताची हत्तींनी अक्षरश: धुळधाण केली आहे. त्याशिवाय राजू देसाई, रमेश पाटील, नारायण वांद्रे आणि संजय कारलगेकर यांच्या भात तसेच ऊसाचे मोठे नुकसान केले आहे.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनक्षेत्रपाल माधुरी दळवाई यांनी शिवारात जाऊन नुकसानीचा पंचनामा केला. तसेच नुकसान भरपाई देण्याची ग्वाही दिली आहे.
भरपाई नको पण हत्ती आवर..
पाच हत्तींचा कळप गेल्या चार दिवसांपासून या परिसरात आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. डॅमचे मुबलक पाणी आणि भात व ऊस पीक असल्याने हत्ती येथे अधिक काळ स्थिरावण्याची शक्यता आहे. हत्ती दिवसाढवळ्या शिवारात मुक्तसंचार करीत असल्याने शेतकऱ्यांच्या जिवालादेखील धोका निर्माण झाला आहे. वनखात्याकडून भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पण, भरपाईऐवजी वनखात्याने हत्तींना या परिसरातून हुसकावून लावावे.
- संजय कारलगेकर, नंदगड
अंगणवाडी भरती घोटाळा; चक्क अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी
नुकताच झालेल्या अंगणवाडी भरती मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. भाजपच्या एका नेत्याने पाली येथील इसमास तीस हजारांना गंडविल्याची घटना समोर आल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींच्या गोटातील या नेत्यांने महिला व बाल कल्याण खात्याचा बनावाट शिक्का आणि अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर केला आहे. पाली येथील शितल प्रविण पाटील यांनी अंगणवाडी शिक्षिकेच्या पदासाठी अर्ज […]