समांतर क्रांती / ब्यूरो रिपोर्ट
लोकसभा, विधानसभा आणि तालुका व जिल्हा पंचायत निवडणुका या पक्षचिन्हावर लढविल्या जातात. पण, ग्राम पंचायतीच्या निवडणुकांमध्ये पक्ष चिन्ह दिले जात नाही, तर इतर चिन्हावर निवडणूक लढविली जाते. आता मात्र ग्राम पंचायतीच्या निवडणुकात सुध्दा पक्षाचे चिन्हावर होणार असल्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत.
महानगरपालिका, नगर पालिका आणि नगर पंचायतींना सुध्दा अद्याप पक्ष चिन्हावर निवडणुका लढविण्याची मुभा नाही. पण यापुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्ष चिन्हावर लढविण्यास मुभा दिली जाणार आहे. यासंदर्भात सरकारसह विरोधी पक्षदेखील आग्रही आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष चिन्ह, झेंडा, बॅनर वापरला जाऊ नये असे निर्बंध होते. गावपातळीवरील सामाजिक स्वास्थाचा विचार करून १९९३ मध्ये निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला होता. पण, हल्ली गाव पातळीवर सुध्दा पक्षीय राजकारणाची घुसखोरी झाली असल्याने पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची मुभा दिली जाणार आहे.
भरधाव कार मंदिरात घुसली; मंदिर जमिनदोस्त
समांतर क्रांती / रामनगर भरधाव कार मंदिरात घुसल्याने सतीदेवी मंदिर जमिनदोस्त झाल्याची घटना शनिवारी (ता.२१) धारवाड-पणजी महामार्गावर चिंचेवाडी येथे घडली. या अपघातात कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना धारवाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर कार रामनगरकडून कुंभार्डाच्या दिशेने निघाली असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार (के.ए. ५१ एमयु ४८३३) थेट मंदिरात घुसली. यावेळी कौलारू सतीदेवी […]