निधन वार्ता
नागुर्ड (ता.खानापूर) येथील गणपती (भैय्या) लक्ष्मण महाजन (वय 17) याचे दीर्घकालीन आजाराने आज गुरुवारी (ता 31) सकाळी 10 वाजता निधन झाले. त्याच्या पश्चात आई वडील, आजी आजोबा, काका-काकू, तीन बहिणी असा परिवार आहे. त्याच्या निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लैला साखर कारखान्याचे कर्मचारी लक्ष्मण महाजन आणि माजी ग्राम पंचायत सदस्या लक्ष्मी महाजन यांचा तो चिरंजीव होता
पंडित ओगलेविरुद्ध पोलिसात गंभीर तक्रार
समांतर क्रांती वृत्तखानापूर: भाजपचा हिंदुत्ववादी कार्यकर्ता पंडित ओगले याच्याविरुद्ध खानापूर पोलिसात तक्रार नोंद झाली आहे. नगर पंचायतीचे मुख्याधिकारी राजू वठारी यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार केल्याने ओगले आणि त्याचे समर्थक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गेल्या तीन दिवसांपासून नगर पंचायतीचे स्वच्छता कर्मचारी वेतनासाठी आंदोलन करीत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या भाजप नेत्यांनी मुख्याधिकाऱ्यांना अर्वाच्य […]