समांतर क्रांती वृत्त
आमच्या शेतकऱ्यांचे भूसंपादन झाले, त्याची भरपाई मिळालेली नाही. महामार्ग पूर्ण झालेला नाही, त्यामुळे प्रवाशी बेहाल आहेत. त्याकडे कुणाचे लक्ष नाही, त्याउलट सर्वसामान्यांची लूट करण्याचा प्रयत्न होत असेल, तर खळ्खट्याक निश्चित आहे, हे विसरू नका, असा इशारा भाजपचे नेते माजी आमदार अरविंद पाटील यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिला. अखेर आजपासून सुरू होणारी टोलवसुली तूर्त स्थगित करण्यात आली आहे.गणेबैल येथील टोलनाक्यावर आजपासून टोलवसुली केली जाणार होती. त्यासाठी प्राधिकारणाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांना घेराव घालण्यात आला.
भूसंपादीत शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळाल्याशिवाय टोल वसुली करू देणार नाही. अशी भूमिका घेत माजी आमदार अरविंद पाटील यांनी त्यांच्या सहकारी नेत्यांसह आज आंदोलन केले. अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारण्यात आला. यावेळी अधिकारी अनुत्तरीत झाले. तुम्ही नियम धाब्यावर बांधत असाल तर कोल्हापूरच्या धर्तीवर ‘टोलबंद’ आंदोलन हाती घेऊ, असे माजी आमदार अरविंद पाटील यांनी सुनावले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका सचिव गुंडू तोपिनकट्टी, युवा नेता पंडीत ओगले यांच्यासह शेतकरी आणि परिसरातील वाहन मालक-चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वडिलांच्या वाढदिनी केला नव्या व्यवसायाचा शुभारंभ
समांतर क्रांती वृत्त खानापूर: बेरोजगारी वाढली आहे, ही ओरड नेहमीचीच झाली आहे, पण तरूणांनी आता सरकारी नोकरीच्या मागे न लागता, स्वत:चा व्यवसाय थाटावा आणि त्यातून समाजसेवा करण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन पत्रकार वासूदेव चौगुले यांनी केले. सावरगाळी येथील उदय नारायण कापोलकर यांच्या कापोलकर ट्रेडर्स या दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि […]