समांतर क्रांती विशेष
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळसुत्राच्या विषयावरून विरोधकांवर बेताल आरोप करीत आहेत. प्रत्यक्षात त्यांच्या विकासाच्या वेंधळ्या कल्पनेमुळे गोरगरिबांना मंगळसुत्राविना लग्ने करण्याची वेळ आली आहे. सोन्याचे दर तब्बल ७५०१५ रुपयांवर पोहचले असून गेल्या दहा वर्षांत तब्बल ४५ हजारांने सोने महाग झाले आहे. मोदीजी आम्ही मुलींची लग्नं कशी करु, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
सर्वसामान्य स्त्रीया सोन्याचे दागिणे घालून मिरवीत नसल्या तरी किमान सोन्याचे मंगळसुत्र तरी गळ्यात असावे अशी माफक आपेअः असते. पण, त्या आपेक्षेवरही सत्ताधारी मोदी सरकारने पाणी फिरविले आहे. ऐन लग्नाच्या हंगामात सोन्याचे दर आभाळाला पोहचले असल्याने संतापात भर पडली आहे. मोदींनी संसार केला असता तर त्यांना मंगळसुत्राची किमत कळली असती अशी प्रतिक्रीया विरोधकांसह सर्वसामान्यांतूनही उमटत आहे.
२००४ साली सोन्याचे दर ५ हजार ८५० रुपये इतके होते. २०१४ साली २८ हजार ६ रुपये ५० पैसे इतके होते. ते आता तब्बल ४५ हजार ९४९ रुपयांनी वाढून ७४ हजार ५० रुपये इतके झाले आहेत. तत्पूर्वीच्या दहा वर्षात केवळ २२ हजार १५६ रुपये इतकी वाढ झाली होती. पण, आता झालेल्या सोन्याच्या दरवाढीवरूनच देशातील महागाईचा अंदाज सहज बांधता येईल, असे मत गर्लगुंजी ग्रा.पं.सदस्य प्रसाद पाटील यांनी व्यक्त केले.
मोदी खुलेआम सरकारच्या विकासाबद्दल खोटे दावे करीत आहे. प्रत्यक्षात सोन्याची दरवाढ ही विकासावरील खर्चामुळे नाही तर देशावर झालेल्या कर्जामुळे झाली आहे. सोन्याचे दरच मुळात देशाचे भांडवल आणि गुंतवणुकीवर ठरत असतात. यावरून एक अंदाज सहज बांधता येतो. देशाची आर्थिक स्थिती खिळखिळी झाली आहे. प्रत्येक नागरीकाच्या डोईवर सध्या १० कोटीहून अधिक कर्जबोजा असावा, असा अंदाज असल्याचे सोने व्यापारी रणजीत रेवणकर यांनी व्यक्त केले.
सांगा पोरींची लग्न कशी करायची?
सोन्याचे दर इतके वाढले आहेत की, साधं डोरलं घ्यायचीही सोय राहिली नाही. सोन्याच्या मंगळसुत्राशिवाय वरपक्ष लग्नाला तयार होत नाही. कांही ठिकाणी साध्या मंगळसुत्रावर वेळ मारून न्यावी लागत आहे. मोदींनी विकास केला म्हटले जात आहे. हाच का तो विकास? जिथे मुलीच्या लग्नाची हौसही भागविता येत नाही, असा संताप श्रीकांत गावडे यांनी समांतर क्रांतीशी बोलतांना व्यक्त केला.
भीक नको पण कुत्रा आवर..
मोदीजी बस्स झाला तुमचा विकास, तुम्ही आता गाठोडे बांधा असे म्हणायची वेळ आली आहे. काश्मिमधून ३७० कलम हटविले, राम मंदिदर बांधले असे सांगून भाजपवाले फसवत आहेत. इथे आम्हाला आमच्या मुला-मुलींची लग्न करायला जीव जातोय. भाजपच्या काळात प्रचंड महागाई वाढली आहे. विकास तर झालाच नाही. उलट उपासमारीची वेळ देशावर आली आहे. त्यामुळे हे सरकार गेले पाहिजे, असे मत रणजीत मोटर यांनी व्यक्त केले.
2004 | .5,850.00 |
2005 | 7,000.00 |
2007 | 10,800.00 |
2008 | 12,500.00 |
2009 | 14,500.00 |
2010 | 18,500.00 |
2011 | 26,400.00 |
2012 | Rs.31,050.00 |
2013 | Rs.29,600.00 |
2014 | Rs.28,006.50 |
2015 | Rs.26,343.50 |
2016 | Rs.28,623.50 |
2017 | Rs.29,667.50 |
2018 | Rs.31,438.00 |
2019 | Rs.35,220.00 |
2020 | Rs.48,651.00 |
2021 | Rs.48,720.00 |
2022 | Rs.52,670.00 |
2023 | Rs.65,330.00 |
2024 (Till Today) | Rs.74,015.00 |
One thought on “हद्द झाली…लग्न.. तेही मंगळसुत्राविना?”