समांतर क्रांती / विशेष रिपोर्ट
खानापुरात सध्या कांहीच अलबेल नाही. येथील शासकीय रुग्णालयाने कात टाकली असली तरी व्यवस्थेत कोणताच बदल झालेला नाही. उपचारापेक्षा इलाज भयंकर अशी येथील स्थिती आहे. लोकप्रतिनिधी तर ‘चमकोगिरी’त गुंतले आहेत. समाजसेवेची झुल पांघरलेले ‘दलाल’ सुध्दा याकडे दुर्लक्ष करीत आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्याच्या समर्थणात उर बडवून घेणारेदेखील सर्वकांही अलबेल असल्याचा आव आणत नेतेगिरी मिरवीत आहेत. परिणामी, तालुक्यातील सामान्य जनतेची मात्र परवड चालल्याचे चित्र संतापजनक आहे.
माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात ६० बेडचे माता-बालक रुग्णालय मंजूर घेतले. रुग्णालयाची इमारत उभी राहिल्यानंतरही विविध कारणांनी शेजारीच असलेल्या जुन्या रुग्णालयाचे स्थलांतर लांबले होते. अलिकडेच जवळपास वर्षभरापूर्वी नव्या इमारतील रुग्णालयाचा कारभार सुरू झाला आहे. पण, येथील कारभार मागच्या पानावरून पुढे सुरू आहे. डॉक्टर, परिचारक आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीत कोणताच बदल झालेले नाहीत. रुग्णालयातील अव्यवस्थेमुळे रुग्णांचे नेहमीची परवड सुरूच आहेत.
माता-बालक रुग्णालयासाठी केवळ एकच प्रसुती आणि महिला रोग तज्ज्ञ कार्यरत आहेत. रुग्णालयासाठी अतिरिक्त दोन तज्ज्ञांच्या नियुक्तीला मंजुरी मिळाली असली तरी अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. इतरही विविध विभागात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे बडा घर पोकळ वासा, अशी स्थिती आहे. ज्या उद्देशाने रुग्णालयाचा कायापालट करण्यात आला, तो उद्देश धुळीस मिळाला आहे. सरकारी रुग्णालयात मोफत आणि माफक दरात उपचार मिळतात. पण, येथील रुग्णालयात गैरव्यवहारांनी कळस गाठला आहे.
सरकारी रुग्णालयातील अनागोंदी कारभाराकडे कुणीच लक्ष देत नसल्याने रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी अक्षरश: रुग्णांची लुबाडणूक करीत असल्याच्या तक्रारी आहेत. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी विकास आढावा बैठकीत संबंधीतांना समज देण्याची गरज होती. पन त्यांनी गेल्या कित्येक महिन्यात विकास आढावा बैठकी घेतलेली नाही. गेला बाजार त्यांनी जनतेच्या तक्रारी समजून घेत रुग्णालयाची पाहणी करून गैरकारभारावर नियंत्रण आणायला हवे होते. पण, त्यांच्याकडून साफ दुर्लक्ष झाले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने रुग्णालयातील कारभार सुधारण्याची मागणी करीत निवेदन दिले होते. पण त्याचा पाठपुरावा समिती नेत्यांनी केलाच नाही. समाजसेवक म्हणून मिरविणारेच डॉक्टरांची ‘दलाली’ करण्यात गुंतले आहेत. एकंदर, येथील रुग्णालयाने कात टाकली असली तरी व्यवस्था मात्र व्हेंटीलेटर आहे. त्याविरोधात आवाज उठविण्याची गरज व्यक्त होत आहे.
अनमोडला भीषण अपघात; एक ठार,एक गंभीर
रामनगर / समांतर क्रांती बेळगाव – गोवा राष्ट्रीय महामार्गांवर जोयडा तालुक्यातील अनमोड येथे मिनी टेम्पो आणि ट्रक यांच्यात धडक बसून आज संध्याकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात टेम्पो चालक जागीच ठार झाला असून ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. मिनी टेम्पो हा हुबळी येथून प्लायवूड भरून गोव्यात जात होता, तर ट्रक हा गोव्यातून कर्नाटकात येत […]