समांतर क्रांती न्यूज
खानापूर: ग्रा.पं.च्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. लवकरच प्रत्येक पंचायतीच्या निवडणुकीसाठीची तारीख जाहीर होणार असून तत्पूर्वी ५१ ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी नोडल अधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. दि. १९ जून रोजी खानापूर तालुक्यातील ग्रा.पं.च्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठीचे आरक्षण जाहीर झाले होते. त्यानंतर निवडणूक कधी होणार याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, नोडल अधिकाऱ्यांची निवड जाहीर करून जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक लवकरच जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत.
निवडणूक नोडल अधिकारी
लोकोपयोगी खात्याचे सहायक कार्यनिर्वाहक अधिकारी यांच्याकडे हेब्बाळ, करंबळ, मणतुर्गा, भुरूणकी, लिंगणमठ या पंचायतींची जबाबदारी असेल. तसेच तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांकडे नंदगड, नेरसे, रामगुरवाडी, आमटे, देवलत्ती, पाणीपुरवठा आणि नैर्माल्य उपविभागाचे सहायक कार्यनिर्वाहक अभियंत्यांकडे क.नंदगड, बेकवाड, शिंदोळी, कोडचवाड, क.बागेवाडी, पशूवैद्याधिकऱ्यांकडे चापगाव, लोकोळी, बरगाव, तोपिनकट्टी आणि इदलहोंड, सहायक कृषी संचालकांकडे गोधोळी, हलगा, हलशी, बिजगर्णी, गुंजी कापोली के.जी. या पंचायतींची जबाबदारी राहणार आहे.
शिरोली, नागरगाळी, लोंढा, घोटगाळी, मोहिशेत या पंचायतींची जबाबदारी पशू संगोपन खात्याचे सहायक संचालक यांच्याकडे तसेच कळसा-भांडूरा उपविभागीय सहायक कार्यनिर्वाहक अभियंत्यांकडे जांबोटी, बैलूर, गोल्याळी, निलावडे, गर्लगुंजी, जि.पं.उपविभागीय सहायक कार्यकारी अभियंत्यांकडे निट्टूर, कणकुंबी, पारवाड, नागुर्डा, हलकर्णी, हेस्कॉमच्या सहायक कार्यकारी अभियंत्यांकडे बिडी, नंजनकोडल, मंग्यानकोप्प, केरवाड, कक्केरी आणि क्षेत्रशिक्षणाधिकाऱ्यांकडे गंदिगवाड, पारिश्वाड, इटगी, हिरे मुनवळ्ळी आणि हिरे हट्टीहोळ्ळी या ग्राम पंचायतींची जबाबदारी राहणार असून या सर्व पंचायतींच्या निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
..म्हणे, यंदा मलप्रभा दुथडी भरून वाहणारच नाही!
समांतर क्रांती वृत्त जांबोटी: आधीच मान्सूनने वाकुल्या दाखवत बळीराजाला हैराण करून सोडले आहे. पावसाला सुरूवात झाली असली तरी अजून जोर नाही. त्यात आता एका साधूने यंदा खानापूर तालुक्याची जीवनदायिनी ‘मलप्रभा’ नदी दुथडी भरून वाहणार नाही, असा दावा एका साधूने केला आहे. विशेष म्हणजे या साधूला त्याच्या कारनाम्यामुळे मंदिर कमिटीने बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर त्याने मलप्रभेच्या पात्रातच […]