गर्लगुंजी परिसरात तरूण उतरले प्रचारात, डॉ. निंबाळकरांना विजयी करण्याचे आवाहन
खानापूर: लोकसभा निवडणुकीत भाजपला हद्दपार करण्याचा चंग काँग्रेससह तालुक्यातील जनतेने बांधला आहे. काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचारासाठी गर्लगुंजी भागातील तरूण प्रचारात गुंतले आहेत. शेत-शिवारात जाऊन हे तरूण मतयाचना करीत आहेत. तसेच राजगार हमी योजनेच्या कामावर जाणाऱ्या महिलांचीदेखील भेट घेऊन यावेळी डॉ. अंजली निंबाळकर यांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.
जसजसा मतदानाचा दिवस जवळ येऊ लागला आहे, तसा प्रचाराचा जोर वाढत आहे. काँग्रेससह भाजपनेदेखील प्रचाराची रणधुमाळी चालविली आहे. भाजपचे उमेदवार हे शिरसीचे असल्याने यावेळी खानापूरला संधी देण्याचा मनोदय स्थानिक नागरीकांतून व्यक्त केला जात आहे. परिणामी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. त्याचा प्रत्यय प्रचारातून येत आहे. गर्लगुंजी परिसरात तरूणांनी स्वयंस्फुर्तीने प्रचाराचा धडाका सुरू ठेवला आहे.
ग्रा.पं.सदस्य प्रसाद पाटील, प्रमोद सुतार, संतोष पाटील आणि मारूती पवार यांनी महिलांची भेट घेत त्यांच्यात विरोधकांकडून पसरवला जाणारा गैरसमज दूर करीत आहेत. नुकताच रोजगार हमी योजनेच्या मजूर महिलांची भेट घेतल्यानंतर बोलतांना प्रसाद पाटील यांनी भाजपचे नेते निवडणुकीनंतर काँग्रेस सरकार पाच गॅरंटी बंद करणार असल्याचा अपप्रचार करीत आहेत. ते पूर्णत: खोटे आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकार भाजपसारखे सर्वसामान्यांवर अन्याय करणार नाही. सर्व योजना सुरू राहतील. भाजप नेत्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर यांना मतदान करून विजयी करा, असे आवाहन केले.
यावेळी बोलतांना मारूती पवार म्हणाला, भाजपने गेल्या दोन निवडणुकांत दिलेली कोणतीच अश्वासने पाळली नाहीत. शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची हमी दिली होती. पण त्याउलट शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे केले. नोकऱ्या देण्याचे अश्वासन दिले पण किती नोकऱ्या दिल्या गेल्या हे भाजपचे खानापुरातील नेते सांगू शकत नाही. हेच नेते काँग्रेस योजना बंद करणार असल्याच्या पुड्या सोडत आहे. या लबाडांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी. त्यासाठी डॉ. निंबाळकर यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवा.
महिला आणि तरूण मतदारांकडून डॉ. निंबाळकर यांना उत्स्फुर्दपणे पाठिंबा व्यक्त केला जात आहे. त्यामुळे प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.
विश्वेश्वर हेगडे यांच्याकडून कोट्यवधींचा गैरव्यवहार
वेंकटेश हेगडे यांचा आरोप; शिरसी दुर्गम राहण्यास तेच कारणीभूत शिरसी: भाजपचे विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी शिक्षणमंत्री असतांना आठवीच्या विद्यार्थ्यांना सायकल वितरण करण्याच्या योजनेत कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे प्रधान सचीव वेंकटेश हेगडे- होसबाळे यांनी केला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष जगदीश गौडा, महिला अध्यक्षा गिता शेट्टी, जिल्हा माध्यम संयोजिका ज्योती पाटील, दीपक हेगडे-दोड्डूर, […]