
समांतर क्रांती / खानापूर
अनेक कारणांनी चर्चेत असलेल्या हलगा गावात आज झालेल्या बैठकीत श्री महालक्ष्मी कृपेने गाव एकवटले. या बैठकीत महालक्ष्मी मंदिराच्या जिर्णोध्दाराचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे गावात एकीची वज्रमूठ आवळली जाईल, असा विश्वास येथील पुढाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
श्री महालक्ष्मी मंदिर येथे हलगा ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. हलगा ग्राम पंचायत सदस्य रणजीत कलाप्पा पाटील यांनी श्री महालक्ष्मी मंदिराचा जिर्णोध्दार व्हावा असा ठराव बैठकीत मांडला. त्याला हलगा ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंबा देऊन सर्वानुमते श्री महालक्ष्मी मंदिर जीर्णोध्दार करून लवकरात लवकर मंदिर बांधकामाला सुरुवात व्हावी असा संकल्प करण्यात आला.
त्यावेळी हलगा गावातील वतनदार मंडळी व गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यामध्ये हलगा ग्र.पं.अध्यक्ष सुनील मारुती पाटील, कल्लाप्पा फटाण नागेशी फटाण, माजी सदस्य तुकाराम फटाण, कृषी पत्तीन संचालक एम.जि.पाटील, निवृत्त शिक्षक अमृत फटाण, माजी ग्रामपंचायत सदस्य हणमंत पाटील, वसंत सुतार, प्रमोद सुतार, पुंडलिक पाटील, गंगाराम फटाण, लक्ष्मण बिस्टेकर, ओमाना केसरेकर,गोपाळ इश्राण, धाकलोजी बिस्टेकर, विजय ईश्राण, सुरेश रुपण, बाबू गुरव, ज्ञानेश्वर सनदी व उपस्थित गावकऱ्यांच्या सर्वानुमते महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार करण्याचा संकल्प करण्यात आला.

सोमवारी (ता.२४) श्री महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार कमिटीची निर्मिती करून मंदिराच्या बांधकाम कार्याला सुरूवात येईल. त्यासाठी हलगा गावातील जे उद्योजक कामानिमित्त बाहेरगावी आहेत, त्यांनी सोमवारी रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता मंदिरामध्ये उपस्थित राहून जीर्णोद्वार करण्याच्या संकल्पामध्ये आपले विचार व्यक्त करावेत, तसेच सर्वांनी उपस्थितीत राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
एकंदर, हलगा गावात अलिकडे झपाट्याने बदल घडून येत असून ही सामाजिक बदलाची नांदी असल्याचे मत ग्रा. पं. सदस्य रणजित पाटील यांनी समांतर क्रांतीशी बोलतांना व्यक्त केले. यामुळे जनसामान्यांना एकवटण्याचा आमचा प्रयत्न असून यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ असे ते म्हणाले.

शिक्षणामुळे मिळते संघर्षाचे बळ: वासुदेव चौगुले
सातनाळी मराठी शाळेचा सुवर्ण महोत्सव उत्साहात पायाभूत सुविधांपासून वंचित असूनही सातनाळी सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मिळवलेले यश केवळ कौतुकास्पद नाही तर अभिमानास्पद आहे. येथील अनेक पिढ्यांना घडविण्याच्या कार्यात या गावच्या सरकारी मराठी शाळेने दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. संकटांना संधी मानून परिस्थितीशी केलेला संघर्ष मानवाला यशस्वी बनवितो. त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून सातनाळी गावाकडे पहावे […]