डॉ. निंबाळकर यांना भरघोस पाठिंबा; हल्याळ तालुक्यात प्रचाराचा धडाका
हल्याळ: भाजपच्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवून देशातील भोळ्या भाबड्या जनतेने दहा वर्षे त्यांच्या हाती सत्ता दिली. सत्तेत आल्यानंतरही भाजपच्या नेत्यांनी खोटे बोलण्याचा उद्योग सोडला नाही. अशा खोटारड्यांना देवही माफ करणार नाही. येत्या निवडणुकीत तरुणांच्या व देशाच्या भविष्यासाठी भाजपला धडा शिकवा असे आवाहन उत्तर कन्नडा लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले.
हल्याळ तालुक्यातील कावलवाड जि. पं. विभागातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. गेल्या दोन दिवसांपासून हल्याळ तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचाराचा धडाका सुरू असून डॉ. अंजली निंबाळकर यांना उदंड प्रतिसाद लाभत आहे.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या, खोटी माहिती आणि हिंदुत्वाच्या नावावर तरुणांना रोजगार व रोजी रोटीच्या प्रश्नांपासून दूर नेऊन त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचे काम भाजप करत आहे. मुठभर लोकांच्या हातात देशाची आर्थिक सत्ता गेली आहे. अशा स्थितीत पुन्हा भाजप सत्तेत आल्यास शेतकरी, कष्टकरी आणि तरूण देशोधडीला लागेल.
आमदार आर. व्ही. देशपांडे म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला अर्पण केलेल्या संविधानामुळे दर पाच वर्षातून एकदा लोकशाहीचा महोत्सव साजरा होतो. याचा विसर पडला असल्यानेच भाजपचे नेते संविधान बदलण्याची भाषा करत आहेत.
यावेळी प्रवक्ते उमेश बोळशेट्टी, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बी. डी. चौगुले, केपीसीसीचे सदस्य सुभाष कोरवेकर यांनी भाजपवर हल्ला चढविला. मुरुकवाड, अंबिकानगर, तेरगाव येथील सभांना कार्यकर्ते व नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
आईचे दागिने उद्योगपतींना विकणाऱ्यांकडून देश रक्षणाची अपेक्षा करता येईल का?
हुलेकल जि.पं. काँग्रेसच्या व्यापक प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांना प्रचंड बहुमतांनी निवडून देण्याची जबाबदारी उत्तर कर्नाटकातील जनतेने उचलली असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. Can we expect protection of the country from those who sell mother’s jewelery to industrialists? पुढे बोलतांना मंत्री पाटील यांनी मोदींवर सडकून टीका केली. ते […]