समांतर क्रांती वृत्त
नंदगड: प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून प्रचार आणि प्रसार केला जात आहे. भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी आमदार अरविंद पाटील यांनी सकाळी त्यांच्या घरावर तिरंगा फडकावून या मोहिमेला सुरूवात केली. देशाभिमान हा आमच्या रक्तात आहे, त्यामुळे हर घर तिरंगा मोहिमेची सुरूवात आमच्या घरापासून करीत आहोत, तालुकावासीयांनी त्यांच्या घरावर तिरंगा फडकावून देशाभिमान जागवावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत केरवाड पंचायतीचे अध्यक्ष मल्लाप्पा तेगूर, कृषी पत्तीनचे अध्यक्ष विठ्ठल हिंडलगेकर, भाजप कार्यकर्ते रायन्नगौडा देमट्टी, प्रदिप पवार, रवि वड्डर, सुरेश कमतगी, फोंडाप्पा मन्नळकर, सागर पाटील हे उपस्थित होते. माजी आमदार अरविंद पाटील यांनी परिसरात तिरंगा वितरीत करून जागृती केली.
https://www.samantarkranti.in/to-the-god-offering-of-tobacco-betel-nut-and-liquor/
डुक्कराचे अर्धा किलो मटन; तिघांवर गुन्हा
समांतर क्रांती वृत्त नंदगड: नागरगाळीचे जंगल हे सागवानसाठी प्रसिध्द आहे. नेहमीच तेथे सागवानची तस्करी होत असल्याच्या तक्रारी वनखात्याकडे येत असतात. त्यावरून आज वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी कृष्णानगर (गवळीवाडा) येथे तीन घरांवर धाड टाकून सागवानच्या लाकडासह जंगली डुक्कराचे मटन जप्त करून तीघांना ताब्यात घेतल्याची माहिती वनक्षेत्रपाल रत्नाकर ओब्बन्नावर यांनी दिली. मिळालेल्या माहितीवरून कृष्णनगर येथील गंगाराम बोडके यांच्या घरी […]