
मणतुर्गे येथे श्री पांडुरंग नाम सप्ताहाला सुरुवात
खानापूर : मणतुर्गे (ता.खानापूर) येथील श्री पांडुरंग अखंड नाम सप्ताहाची बुधवार दि. ५ रोजी रात्रौ ८ वाजता जय जय राम कृष्ण हरी या नाम मंत्राने सुरुवात झाली. पुढील पाच दिवस हा सप्ताह होणार असून या काळात हरिनामाच्या गजरात परिसर न्हाऊन निघणार आहे. तरी भाविकांनी या पर्वणीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
माघ शुद्ध अष्टमी ते माघ शुद्ध द्वादशी (बुधवार दि.५ फेब्रुवारीं ते रविवार दि.९ फेब्रुवारी )पर्यंत सालाबादप्रमाणे साजरा होणाऱ्या या सप्ताहात गुरुवार दि. ६रोजी सायंकाळी ७ ते ९ पर्यंत महिला संगीत भजन मंडळ खानापूर यांचे भजन, रात्रौ ९ ते ११ श्री महालक्ष्मी संगीत भजन मंडळ काटगाळीे यांचे संगीत भजन त्यानंतर श्री चव्हाटा भजनी मंडळ हेब्बाळहट्टी यांचा सोंगी भारुड भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवार दि. ७ रोजी सायंकाळी ६ ते ८ पर्यंत श्री बालशिवाजी भजनी मंडळ मणतुर्गे यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम, ८ ते ९ महिला भजनी मंडळ शेडेगाळी यांच्या भजनाचा कार्यक्रम, त्यानंतर हारुरी, शेडेगाळी यांचा भजनी कार्यक्रम होईल.रात्रौ१० ते ११ दारोळी, ओलमणी यांचे संगीत भजन. त्यानंतर श्री चव्हाटा तरुण भजनी मंडळ घाडी गल्ली कारलगा यांचा सोंगी भारुड कार्यक्रम.
शनिवार दि. ८ रोजी सायंकाळी ६ ते८ रवळनाथ भजनी मंडळ शेडेगाळी यांचे संगीत भजन रात्रौ८ ते १० पर्यंत शिरोली, नेरसा, जामगाव यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम. त्यानंतर श्री संत एकनाथ भजनी मंडळ कारलगा यांचा सोंगी भजनी भारुड कार्यक्रम होणार आहे. रविवार दि. ९ रोजी सकाळी ९ वा. महाआरती नंतर पालखी सोहळा होऊन श्री पांडुरंग नाम सप्ताहाची सांगता होईल. त्यानंतर सकाळी ११ वाजल्यापासून महाप्रसादाला सुरुवात होईल.
रात्रौ ८वाजता प्राथमिक मराठी मुलांची शाळा मणतुर्गे यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या पाच दिवसांच्या सप्ताहात रोज सकाळी ६ते७ काकडा आरती, सायंकाळी ५ ते ६पर्यंत सिद्धकला भजनी मंडळाचे भजन त्यानंतर हरिपाठ, कीर्तन व प्रवचन आदी कार्यक्रम होतील, तरी भाविकानी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री पांडुरंग अखंड नाम सप्ताह उत्सव कमिटी आणि मणतुर्गे ग्रामस्थांनी केले आहे.
श्री विश्वकर्मा जन्मोत्सव विशेषांकाचे प्रकाशन उत्साहात
समांतर क्रांती / खानापूर येथील श्री विश्वकर्मा समाज विकास मंदिर ट्रस्टच्या श्री विश्वकर्मा जन्मोत्सव विशेषांकाचे प्रकाशन नुकताच गोवा क्रॉस येथील श्री विश्वकर्मा मंदिरात उत्साहात पार पडले. श्री विश्वकर्मा महात्म्य, खानापूर तालुक्यातील कलाविष्कार आणि ट्रस्टच्या वाटचालीचा उहापोह या विशेषांकात करण्यात आला आहे.सदर विशेषांकाची निर्मिती आणि मुद्रण ‘समांतर क्रांती’ पब्लिकेशन्स्ने केली आहे. ट्रस्टच्या कार्याची माहिती मिळावी, यासाठी […]