समांतर क्रांती / जांबोटी
दुरुस्तीच्या तातडीच्या कामासाठी उद्या रविवारी (ता. 5) जांबोटी भागात वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे. उचवडे, बैलूर, मोरब, जांबोटी, चिखले, पारवाड, कुसमळी, चिगूळे या गावात सकाळी 10 ते सायंकाळी 6पर्यंत वीज खंडित केली जाणार आहे.
रुग्णालयाने कात टाकली, पण व्यवस्था व्हेंटीलेटरवच!
समांतर क्रांती / विशेष रिपोर्ट खानापुरात सध्या कांहीच अलबेल नाही. येथील शासकीय रुग्णालयाने कात टाकली असली तरी व्यवस्थेत कोणताच बदल झालेला नाही. उपचारापेक्षा इलाज भयंकर अशी येथील स्थिती आहे. लोकप्रतिनिधी तर ‘चमकोगिरी’त गुंतले आहेत. समाजसेवेची झुल पांघरलेले ‘दलाल’ सुध्दा याकडे दुर्लक्ष करीत आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्याच्या समर्थणात उर बडवून घेणारेदेखील सर्वकांही अलबेल असल्याचा आव आणत नेतेगिरी […]