
समांतर क्रांती / खानापूर
लोंढा (ता. खानापूर) येथील ३३ केव्ही विद्युत केंद्रात दुरुस्ती कार्य राबविण्यात येणार असल्याने आज शनिवार दि. ११ रोजी लोंढा, नागरगाळी, वरकड, वरकड पाट्ये, मोहिशेत, सातनाळी, माचाळी, घारली, पिंपळे, मुंडवाड, चिंचेवाडी, कोडगई, सुवातवाडी, तारवाड, कुंभार्डा, बामनकोप, कृष्णनगर, नागरगाळी, नागरगाळी रेल्वे स्थानक, वाटरे, जोमतळे, कामतगा, शिंपेवाडी, भटवाडा, जटगे, गुंजी, गुंजी रेल्वे स्थानक, संगरगाळी, भालके बिके, भालके के एच, नायकोल, माणिकवाडी, ढोकेगाळी, तिवोली वाडा, सावरगाळी, शिंदोळी, गंगवाळी, हारुरी, शेडेगाळी, होनकल या भागातील वीज पुरवठा दिवसभर खंडित राहणार आहे. नागरिक व व्यवसायिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंते जगदीश मोहिते यांनी केले आहे.
इनसाईड स्टोरी: असे झाले नक्षलींचे आत्मसमर्पण..
चेतन लक्केबैलकर तिकडे छत्तिसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आठजण मृत्यूमुखी पडल्याची घडत असतांना आणि त्या घटनेतील मृतात पूर्वाश्रमीच्या पाच नक्षलींचा समावेश असल्याने खळबळ माजली असतांनाच इकडे कर्नाटकात मात्र सहा नक्षलींनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केले. विशेष म्हणजे या संपूर्ण मोहीमेत मराठी माणसाचे योगदान महत्वाचे ठरले आहे. कर्नाटक राज्याने गेल्या वर्षी स्थापन केलेल्या नक्षल आत्मसमर्पण आणि पुनर्वसन समितीने […]