समांतर क्रांती / बेळगाव
महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाहनाचा अपघात कंटेनरने धडक दिल्यानेच झाला असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी स्पष्ट केले आहे. हा पूर्वनियोजीत कट नाही, असेही ते म्हणाले असले तरी आता या अपघाताबाबत शंका-कुशंकाना ऊधाण आले आहे.
काल मंगळवारी (ता.१४) सकाळी ६ च्या सुमारास हा अपघात झाला होता. त्यानंतर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या गनमनने कित्तूर पोलिसात सरकारी वाहन चालकाविरोधात फिर्याद दाखल केली होती. पण, फिर्यादीत विरोधाभास आढळून आल्यानंतर चालक शिवप्रसाद गंगाधरय्या यांच्याकडून फिर्याद नोंदविण्यात आली आहे. चालकांने दिलेल्या माहितीनुसार मंत्र्यांच्या वाहनाला कंटेनरने धडक दिल्याचे समोर आले आहे.
अंबाडगट्टी क्रॉसजवळ कंटेनर डावीकडून उजवीकडे आला, त्यानंतर कंटेनरने हेब्बाळकर यांच्या वाहनाला धडक दिली. अपघातानंतर कंटेनर चालकाने वाहन न थांबवता पळून गेला आहे. त्यामुळे हा अपघात पूर्वनियोजीत होता का? असा संशय बळावला आहे. पण, पोलिस अधिक्षकांनी हा अपघात पूर्वनियोजीत नसल्याचे म्हटले आहे. अपघातादरम्यान टोल नाक्यावरून ४२ वाहने गेली असून दोन विशेष पोलिस पथकांद्वारे त्या वाहनांचा तपास केला जात असल्याचे एसपी डॉ. गुळेद यांनी सांगितले.
समांतर क्रांतीचा अंदाज खरा..
मंत्र्यांच्या वाहनासमोर एस्कॉर्ट वाहन असते. तरीही मंत्री हेब्बाळकर यांच्या वाहनाचा अपघात झाल्यामुळे शंकेचे वातावरण तयार झाले आहे. कालच याबाबत समांतर क्रांतीने कंटेनर मध्ये कसा आला, अशी शंका व्यक्त करून या घटनेमागील सत्य वेगळेच असल्याचा दावा केला होता. एसपी डॉ. गुळेद यांनी ही घटना ‘हिट अँड रन’ची असल्याचे स्पष्ट केले आहे.
खानापुरातील ‘विठ्ठल नादा’त गोल्याळीचे भजनी मंडळ अव्वल
समांतर क्रांती / खानापूर येथील चौराशीदेवी संगीत कला मंच आयोजित ‘विठ्ठल नाद’ संगीत भजन स्पर्धेत गोल्याळी येथील श्री रवळनाथ भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत तालुक्यातील १५ भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत जांबोटीच्या श्री रामकृष्ण भजनी मंडळाने दुसरा क्रमांक पटकाविला.तर दारोळी येथील शिवगणेश भजनी मंडळ, हब्बनहट्टीच्या स्वयंभू हनुमान भजनी मंडळ, कुपटगिरी येथील विठ्ठल […]