समांतर क्रांती / व्यवसायवृध्दी
अन्न हे पूर्णब्रम्ह.. ही आपली संस्कृती. याच संस्कृतीला साजेसे उदरभरण करण्यासाठी सध्या खानापुरातील एकमेव ठिकाण म्हणजे बस स्थानकातील ‘हॉटेल गणेश’. हॉटेल व्यवस्थापनाने प्रवाशी आणि खानापूरवासीयासाठी चविष्ठ अशी व्हेज थाळी सुरू केली आहे. ग्राहकांच्या खिशाला परवडेल, अशा किमतीत ही थाळी हॉटेल गणेशमध्ये मिळत असल्याचे हॉटेल व्यवस्थापनाने कळविले आहे.
नुकताच काँग्रेसच्या राष्ट्रीय सचीव तथा खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते हॉटेल गणेशचे थाटात उद्घाटन झाले. आवघ्या कांहीच दिवसात खानापूर तालुकावासीयांच्या मनात घर करीत असलेल्या हॉटेल गणेशमध्ये नाष्टासह स्नॅक्स्, कोल्ड्रींक-आईस्क्रीम आणि आता चविष्ठ अशा जेवणाची मेजवाणीही मिळणार आहे.
सकाळी ७ वाजल्यापासून हॉटेल ग्राहकांच्या सेवेत असेल. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत नाष्टा मिळेल. तर सकाळी ११.३० पासून दुपारी ४ पर्यंत जेवण मिळते. व्हेज थाळी केवळ १०० तर मिनी थाळी ७० रुपयात मिळत असून ग्राहकांचे समाधान हीच आमची खरी कमाई असल्याचे व्यवस्थापनाचा दावा आहे. एकदा खाल, तर पुन्हा- पुन्हा याल, ही आमची टॅगलाईन असून एकदा हॉटेल गणेशला भेट द्याच, असे आग्रहाचे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.
तबल्याचा ‘ठेका’ हरपला; झाकीर हुसैन कालवश
दिल्ली: प्रसिध्द तबला वादक झाकीर हुसैन यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे निधन झाले. तेथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. पंजाब घराण्याचे प्रसिध्द तबला वादक उस्ताद अल्लारखाँ यांचे जेष्ठ सुपूत्र असलेले झाकीर हुसैन यांची आज रविवारी (ता.१५) संध्याकाळी अचानक तब्बेत बिघडली. त्यांना तात्काळ अमेरिकेतील रुग्णालयात […]