
Breaking : हलसीवाडी (ता. खानापूर) अट्टल शिकाऱ्याचीच शिकार झाली आहे. डुक्कराची शिकार करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असताना नागरगाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या मुसक्या अवळल्या आहेत. संशयिताकडे आठ किलो मांस आणि शिजवलेले दोन किलो मांस सापडले आहे. संशयिताला ताब्यात घेऊन वन विभागाने तपास चालवीला आहे.

डुक्कराची शिकार केल्याप्रकरणी अर्जून देसाईंना अटक
समांतर क्रांती / खानापूर जंगली डुक्कराची शिकार केल्याप्रकरणी नागरगाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हलशीवाडी येथील अर्जून देवाप्पा देसाई (५८) यांना आज गुरूवारी (ता.१६) सकाली अटक केली आहे. नागरगाळी वनविभागाला मिळालेल्या माहितीवरून सकाळी ८.४५ वाजता संशयीत आरोपी अर्जून देसाई यांच्या घरावर छापा मारण्यात आला. यावेळी त्यांच्याकडे डुक्कराचे दोन किलो मांस आढळले. मांसासह त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली […]