खानापूर : सध्या हरघर तिरंगासाठी सगळीकडे शासकीय पातळीवर तिरंगा वाटपाला वेग आला आहे. पण. यंदा शेतातदेखील तिरंगा फडकणार आहे. कर्नाटक सरकारच्या सलसंवर्धन खात्याने हा निर्णय घेतला आहे. त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. जलसंवर्धनाचा संदेश गावोगावी पोहोचविण्यासाठी यंदाच्या स्वातंत्र्य दिन आयोजनाला शेती, पाणी आणि निसर्ग प्रेमाच्या महत्वाची सांगड घालण्यात आली आहे. शिवारात रोहयो मजुरांनी साकारलेल्या तलावांच्या काठावर ध्वजारोहण करून लोकसहभागातून तयार झालेल्या तलावांना स्थानिक शहीद जवानांचे नाव देण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने ‘अमृत सरोवर’ ही योजना सुरू केली. रोहयोतून एका तलावाची निवड करून त्याचा समग्र विकास करण्याची ही योजना आहे. या योजनेअंतर्गत तालुक्यात 22 तलावांची कामे हाती घेण्यात आली. त्यापैकी आठ तलावांची कामे पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानुसार ज्या तलावांचे काम पूर्ण झाले आहे. त्या ग्रामपंचायतीने तलावाच्या काठावरच सामूहिक ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडावा असा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे तलावांच्या काठावर ध्वज स्तंभांची उभारणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत एखादा जवान शहीद झालेला असल्यास त्या शहीदाचे नाव तलावाला देण्यात येणार आहे. जवानाच्या नावाचा फलक देखील लावण्यात येणार आहे.
दगडी नाम फलकावर शहीदाचे नाव, ग्रामपंचायतीचे नाव, पंतप्रधानांचा आणि मुख्यमंत्र्यांचा संदेश कोरण्यात येणार आहे. ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत एकही जवान शहीद झालेला नाही. तेथे महात्मा बसवेश्वर यांचे वचन कोरले जाणार आहे.ज्या गावात तलाव उपलब्ध नाही. तेथे शाळेच्या आवारात किंवा ग्रामपंचायतच्या आवारात शिलाफलक लावण्यात येणार असल्याचे रोहयोचे सहायक संचालक शेखर हिरेसोमन्नवर यांनी सांगितले. सध्या आठ तलाव पूर्ण झाल्याने त्या ग्रामपंचायतीच्या अखत्यारितील शहिदांची नावे तेथील तलावांना दिली जाणार आहेत. ही नावे सैन्य दलाकडून मिळवण्यात आली आहेत.
This article is an absolute treasure. I’ve saved it for a future reference. Thank you for your valuable information!
I appreciate the effort and time you’ve spent in putting together this information. Thank you for sharing this with us.
Thank you for this informative article. It helped me comprehend the subject better. Nice!