समांतर क्रांती
Income tax raid बंगळूर: आयकर खात्याने आज मंगळवारी (ता.१७) पहाटेच बंगळूर महानगरातील पाच ठिकाणी बिल्डर्सची निवासस्थाने व कार्यालयांवर छापा मारला. अचानक झालेल्या या कारवाईने राज्यभरातील बिल्डर्स आणि डेव्हलपर्समध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या छाप्याचे धागेदोरे बेळगावसह राज्यातील विविध शहरांशी जुळले असल्याचे समजते. पहाटेपासून सुरू झालेली छापेमारी आणि कागदपत्रांची तपासणी अद्यापही सुरू आहे.
पोलिस हेड कॉन्स्टेबल जयराम हमन्नावर यांची तडकाफडकी बदली
समांतर क्रांती / खानापूर येथील पोलिस स्थानकातील बहुचर्चीत हेड कॉन्स्टेबल जयराम हमन्नावर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खानापूर तालुक्यात कार्यरत असलेल्या जयराम यांना शहरातील लॉजवरील छापा प्रकरण भोवले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तशी चर्चा सध्या खानापूरात सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जयराम हमन्नावर हे खानापूर आणि नंदगड येथे सुध्दा कार्यरत […]