चेतन लक्केबैलकर
तिकडे छत्तिसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आठजण मृत्यूमुखी पडल्याची घडत असतांना आणि त्या घटनेतील मृतात पूर्वाश्रमीच्या पाच नक्षलींचा समावेश असल्याने खळबळ माजली असतांनाच इकडे कर्नाटकात मात्र सहा नक्षलींनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केले. विशेष म्हणजे या संपूर्ण मोहीमेत मराठी माणसाचे योगदान महत्वाचे ठरले आहे.
कर्नाटक राज्याने गेल्या वर्षी स्थापन केलेल्या नक्षल आत्मसमर्पण आणि पुनर्वसन समितीने अवघ्या वर्षभरात चिकमंगळूरच्या जंगलातील सशस्त्र नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणले आहे. गेल्या दोन दशकांपासून भूमिगत राहून लढा देणाऱ्या कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूतील सहा जणांनी शरणागती पत्करली आहे. चिक्कमगळूरूच्या लता मुंडागारू, दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुंदरी कुथलूर, चिक्कमगलुरू जिल्ह्यातील वनजाक्षी बालेहोळ, रायचूर जिल्ह्यातील मारेप्पा अरोली, केरळच्या वायनाडची जिशा, तामिळनाडूचे के.वसंत वेल्लोर यांनी आत्मसमर्पण केले.
नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण यशस्वी होण्यास विविध घटक कारणीभूत ठरले. कर्नाटक सरकारची दूरदृष्टी आणि सामाजिक संवेदनशीलता, राज्य सरकारची नवीन आत्मसमर्पण धोरणे, पॅकेज, तत्कालीन एडीजीपी शरदचंद्र यांनी तयार केलेले आत्मसमर्पणाचे धोरण, राज्याच्या गृह विभागाचे उच्च अधिकारी हेमंत निंबाळकर यांचे वेळीच मिळालेले मार्गदर्शन व सहकार्य लाभले. गुप्तचर विभागाचे प्रमुख हरिराम शंकर यांचा नक्षल कारवायाबाबतचा अभ्यास आणि रणनीती, सरकारच्या नवीन आत्मसमर्पण धोरणाच्या घोषणेमध्ये आणि समितीच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे व्यंकटेश प्रसन्ना यांचे मार्गदर्शन लाभले. यामुळेच ही आत्मसमर्पण मोहीम फत्ते होऊ शकली.
या मोहीमेबद्दल हेमंत निंबाळकर लिहीतात..
या प्रक्रीयेचे सुत्रधार गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक हेमंत निंबाळकर यांनी लिहिले आहे की, ‘‘ही प्रक्रीया अत्यंत किचकट होती. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता ही मोहीम फत्ते करतांनाच देशासमोर एक नवा अध्याय मांडायचा होता. ही धडपड तब्बल ४८ तास चालली होती. नक्षल आत्मसमर्पण प्रक्रिया चिक्कमंगळूरमध्ये व्हावी, असे प्रथम ठरले होते.पण, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रीया थेट बंगळुरूला पूर्ण व्हावी अशी योजना होती. याची माहिती बहुधा चिक्कमंगळूरमध्ये जमलेले पूर्वाश्रमीचे नक्षलवादी, पोलीस अधिकारी, तसेच जिल्हा प्रशासनाला नव्हती.’’
सहा नक्षलवादी (समिती सदस्यांसह) सरकारी गाड्यांमधून निघालेल्या गाड्यांचा ताफा गेल्यावर पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांचा पोलिसांशी वाद झाल्याची घटनाही घडली. पण, खचून न जाता नक्षल आत्मसमर्पण समिती आणि पोलिस पथकाने सहा जणांना बंगळुरूला आणण्यात यश मिळवले आणि हेमंत निंबाळकर यांचे इंटेलिजन्स जिंकले.
मुख्यमंत्र्यांकडून संविधान देऊन स्वागत
बंगळूर येथे नक्षलींनी आत्मसमर्पण केल्यानंतर मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी कन्नड वाचणाऱ्यांना कन्नडची राज्यघटना, ज्यांना कन्नड वाचता येत नाही, त्यांना इंग्रजी भाषेतील संविधानाची प्रत आणि फूल देऊ स्वागत केले. त्यांनी शांतपणे नक्षलवाद्यांना कोणतीही गडबड न करता बोलण्यास सांगितले हे विशेष. लता मुंडागारू यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत कोंढांची येथील लोकांच्या समस्यांसह त्यांनी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात, तसेच विक्रम गौडलू यांच्या हत्येची चौकशी राज्य सरकारसमोर व्हावी, अशी मागणीही केली. मागण्या तपासून त्यांचा पाठपुरावा करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
नक्षलावाद्यांचा प्रभाव असलेल्या बहुतेक राज्यांनी यापूर्वी सुध्दा नक्षलींच्या समर्पणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. सलवा जुडूमसारख्या मोहीमांनी तर नक्षलवादापुढे नांगी टाकली. त्याउलट नक्षलींचा प्रभाव वाढतच गेला. पण, कर्नाटक सरकारने नक्षल आत्मसमर्पण आणि पुनर्वसन समितीची स्थापना करून जी धोरणे आखली आहेत, त्याला आलेले हे पहिले यश प्रशंसनयीयच आहे.
नक्षलवाद रोखण्यात राजकीय हस्तक्षेप आडवा येतो, हा आजवरचा अनुभव कर्नाटकातील राज्य सरकारच्या मंत्र्यांनी खोटा ठरविला आहे. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनी जो सामंजस्यपणा आणि धडाडी दाखविली त्याचेही कौतूकच करावे लागेल. गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक हेमंत निंबाळकर यांनी ज्या पध्दतीने त्यांच्या अनुभवांचा वापर करीत ही मोहिम फत्ते केली, त्याबद्दल त्यांच्या कार्यकर्तृत्वाला दादच द्यावी लागेल. एकंदर, नक्षलवादाविरोधातील सशस्त्र लढ्यापेक्षा हा सामंजस्याचा लढा समाजाला नवी दिशा देईल. म्हणूनच सिध्दरामय्या सरकारचे करावे तेवढे कौतूक कमीच आहे.
नेरसे फाट्याजवळ दुचाकीला कारची धडक; दोघे गंभीर जखमी
समांतर क्रांती / खानापूर खानापूर-अनमोड मार्गावरील नेरसे फाट्याजवळ कारने दुचाकीला मागून ठोकरल्याने झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात लकमान्ना सन्नाप्पा हणबर ( ६५, मुडगई) आणि मल्लव्वा महेश गावडे (४५, जगलबेट, ता.जोयडा) हे जखमी झाले असून त्यांच्यावर येथील सरकारी रुग्णायलात प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी बेळगावला हलविण्यात आले आहे. घटनास्थळावरून मिळालेली अधिक […]