खानापूर : हलकर्णी ता. खानापूर येथील नामांकित सरकारी कंत्राटदार ईश्वर अंबाजी खानापुरी (83) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. आज शनिवारी सकाळी 12 वा. हलकर्णी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी होणार आहे. राज्य औद्योगिक बॅंकेचे माजी उपाध्यक्ष दिवंगत कृष्णा खानापुरी यांचे ते मोठे बंधू होते.
प्रज्वल प्रकरणाचा इफेक्ट; ‘उत्तर कन्नड’मध्ये निजदला खिंडार
भटकळचे नेते शहाबंदरी काँग्रेसवासी; भाजपला धक्का कुमठा: निधर्मी जनता दलाचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या महिलांवरील अत्याचार प्रकरणाचा इफेक्ट पक्षावर होत आहे. त्याचाच परिपाक म्हणून उत्तर कन्नड (कारवार) जिल्ह्यातून मोठ्या संख्येने निजद नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसचा हात धरत आहेत. त्याचा फटका भाजपच्या उमेदवारालादेखील बसणार असून काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर यांच्या विजयाचा मार्ग मात्र सुकर झाला आहे. […]