जांबोटी मल्टीपर्पजच्या खानापूर शाखेचा रौप्य महोत्सव उत्साहात
समांतर क्रांती / खानापूर
ज्या काळात खानापूर तालुक्यात सहकार चळवळीची सुरूवात झाली तो काळ मागासलेपणाचा होता. आज सहकार क्षेत्र ऐन उमेदीत असतांना ही चळवळ चालविणे जिकीरीचे बनत चालले आहे. काळ कठीण आहे, पण आर्थिक पाठबळासाठी सहकारी संस्था जिवंत राहिल्या पाहिजेत, त्या जगविण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचा सूर आज बुधवारी (ता.०१) जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीच्या खानापूर शाखेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजीत कार्यक्रमात उमटला.
जांबोटी येथे १ जानेवारी १९९३ साली स्थापन झालेल्या जांबोटी पतसंस्थेने ३३ व्या वर्षात पदार्पन केले, तर या संस्थेच्या खानापूर शाखेचा आज रौप्य महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक विलास बेळगावकर होते.
आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, तहशिलदार प्रकाश गायकवाड, वकील समघटनेचे अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी आणि व्हन्नव्वादेवी पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठल पाटील यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. संचालक भैरू पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक संचालक अन्नासाहेब कुरतूडकर यांनी केले. सेक्रेटरी दिलीप हन्नुरकर यांनी अहवाल वाचन करतांना संस्थेकडे ४५ कोटींचे खेळते भांडवल तर ४० कोटींच्या ठेवी असल्याची माहिती यावेळी दिली. आतापर्यंत १३०८ जणांना दुचाकी ते जेसीबीपर्यंतच्या वाहनांचे वितरण करण्यात आल्याचे ते म्हणाले.
यावेळी बोलताना माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील म्हणाले, जांबोटी पतसंस्थेच्या माध्यमातून विलास बेळगावकर आणि त्यांच्या सहकारी संचालकांनी तालुक्यात सहकाराचे रोपटे लावले. त्याचा आज वृक्ष होत असतांना ज्या काळात ही संस्था सुरू झाली तो काळ अत्यंत कठीण होता.केवळ जांबोटी भागाच्या आर्थिक विकासाच्या हेतूने त्यांनी ही संस्था मोठ्या शिताफीने चालविली आहे. माजी आमदार दिवंगत अशोक पाटील यांनी तालुक्यात या चळवळीला पाठबळ दिले. कृषी पत्तीन सहकारी संस्था पुनरुज्जीवीत करून देत आम्ही सावकारी मोडीत काढली.
आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सहकाराची ही चळवळ महाराष्ट्रातून बेळगाव जिल्ह्यात फोफावल्याचे सांगत आताच्या कठीण स्थितीत केवळ कर्ज वितरणापूरते मर्यादीत न राहता पतसंस्थांनी उद्योगांकडे वळावे. तसेच अशा या संस्था टिकविण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
भांडवलदार बँका आता गावखेड्यांपर्यंत येत आहेत. त्यातून सहकार चळवळीला धोका निर्माण झाला आहे. पण, सहकार चळवळ संपुष्टात आली तर याच भांडवलदार बँका सावकारशाही सुरू करतील. सर्वसामान्य माणूस नाडविला जाईल, अशी भिती अध्यक्ष विलास बेळगावकर यांनी व्यक्त केली. सहकार चळवळ जोपासण्याची जबाबदारी सर्वस्वी जनसामान्यांवर येऊन ठेपली असल्याचे ते म्हणाले. यावेळी वकील संघटेनचे अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी, खानापूर तालुका पतसंस्थेचे अध्यक्ष आबासाहेब दळवी, तहशिलदार प्रकाश गायकवाड, संचालक भैरू पाटील यांनी विचार व्यक्त केले.
यावेळी संस्थेशी प्रामाणिक व्यवहार केल्याबद्दल तुकाराम भेकणे, अमर जोरापुरे, रामदास घाडी, रामचंद्र खांबले, श्रीकांत लक्केबैलकर यांच्यासह विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला संचालक विद्यानंद बनोशी, यशवंत पाटील, पांडूरंग नाईक, शाहू गुरव, हणमंत काजुनेकर, खाचाप्पा काजुनेकर, पुंडलिक गुरव, भाऊ कुर्लेकर, भरमाणी नाईक, संचालिका गिता इंगळे, सरस्वती पाटील, खानापूर शाखेचे व्यवस्थापक सुर्यकांत बाबशेट आदींसह कर्मचारी, सभासद व हितचिंतक उपस्थित होते. उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी यांनी आभार मानले.
Khanapur: तरूणाचे अपहरण करून बेदम मारहाण
समांतर क्रांती / खानापूर Khanapur: A youth was kidnapped and brutally beaten. क्षुल्लक कारणावरून एका तरूणाचे अपहरण करून बेदम मारहाण करीत खूनाचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील देवलत्ती येथे घडली आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद झाला असून संशयीत फरारी आहेत. कांही दिवसांपूर्वी देवलत्ती येथील तरूणावर अपशब्द वापरल्याचा आळ घेत दोघांनी त्याला त्याच्या घरी जाऊन मारहाण […]