समांतर क्रांती / खानापूर
तालुक्यातील पहिली पतसंस्था जांबोटी बहुउद्देशीय सहकारी पतसंस्थेच्या खानापूर शाखेचा रौप्य महोत्सव बुधवार दि. ०१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठीक ११.०० वा. होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलासराव कृष्णाजी बेळगांवकर (संस्थापक अध्यक्ष) राहणार आहेत.
वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिपप्रज्वलन महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आमदार विठ्ठल सो. हलगेकर, श्री पिसेदेव मल्टीपर्पज को-आप सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार दिगंबर य. पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माजी आमदार अरविंद चं. पाटील, तहशिलदार प्रकाश गायकवाड, सहकार खात्याचे जिल्हा उपनिबंधक रवींद्र पाटील, जिल्हा को.ऑप सोसायटी युनियनचे अध्यक्ष आर. बी. बांडगी, वकिल संघटनेचे अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहकार विकास अधिकारी नवीन हुलकुंद, अर्बन बँकेचे निवृत्त व्यवस्थापक आर. पी. जोशी, भाग्यलक्षमी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. व्ही. एन्. पाटील, श्री व्हन्नव्वादेवी पतसंस्थेचे अध्यक्ष विठ्ठल क. पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष विलास कृष्णाजी बेळगांवकर, उपाध्यक्ष पुंडलीक रामचंद्र नाकाडी, संचालक शंकर रायाप्पा कुडतरकर, भैरु वाघु पाटील, पांडूरंग नारायण नाईक, हणमंत आप्पाजी काजुणेकर, पुंडलीक रामलींग गुरव, भरमाणी रामा नाईक, संचालिका श्रीमती सरस्वती अशोक पाटील, सौ. गिता विलास इंगळे, विद्यानंद विरभद्र बनोशी, यशवंत भरमाणी पाटील, शाहू कृष्णा गुरव, खाचाप्पा रामचंद्र काजुणेकर, भाऊ सदाशिव कुर्लेकर, दिलीप संतु हन्नुरकर, सुर्यकांत मनोहर बाबशेट यांनी केले आहे.
भीमगड अभयारण्य: पर्यटक तुपाशी; स्थानिक उपाशी..
समांतर क्रांती / विशेष भीमगड अभयारण्यातील गावांना शासकीय सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या सरकारने १३ गावांच्या स्थलांतरासाठी कंबर कसली आहे. या गावांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देताना तेथील वन्यजीवन धोक्यात येणार असल्याची मखलाशी वनखात्याकडून केली जात आहे. दुसरीकडे वनखात्याने पर्यटकांसाठी जंगल सफारीची योजना आखली आहे. त्यामुळे वन्यजीव धोक्यात येणार नाहीत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकताच […]