खानापूर तालुक्याच्या सहकार चळवळीला शतकोत्तर परंपरा लाभलेली आहे. सावकार-जमिनदारांच्या ‘ॠणा’त राहून पिचलेल्या या तालुक्यातील जनतेला याच सहकार चळवळीने जगण्याचे बळ दिले. जरी या चळवळीला शतकोत्तर परंपरा असली तरी, खऱ्या अर्थाने या चळवळीचा सुर्योदय झाला तो जांबोटी येथील पहिल्या पतसंस्थेच्या स्थापनेनंतरच. १९९५ साली ज्या काळात अजुनही संपूर्ण तालुक्यात मुलभूत सुविधा म्हणाव्या तशा पोहचल्या नव्हत्या अशा विलास कृष्णाजी बेळगावकर यांनी जांबोटी पतसंस्थेची स्थापना केली. त्यांच्या या संस्थेच्या खानापूर शाखेचा बुधवारी (ता. १ जानेवारी) रौप्य महोत्सव साजरा होत आहे, त्यानिमित्त सहकार चळवळीत जांबोटी पतसंस्थेने दिलेल्या योगदानाचा घेतलेला हा आढावा..
एक काळ होता. शेतकरी शेतात जे पिकवायचा, त्यातील बहुतेक धान्य मळणीच्या खळ्यावरून सावकार आणि जमिनदारांच्या घरात जायचे. वर्षभर विविध कारणांसाठी या सावकार-जमिनदारांकडून त्या बिचाऱ्याने कर्ज घेतलेले असायचे. यात विशेष शोचणीय बाब अशी की, सावकार-जमिनदार गरिब शेतकऱ्यांची फसवणूक करीत. पिळवणूक करीत. यातून सर्वसामान्य माणूस पुरता घायकुतीला यायचा. हा प्रकार सर्रास सगळीकडे सारखाच होता. शेतकरी कुटुंबातून आलेले विलास बेळगावकर यांनी ही सामाजिक विसंगती पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या जांबोटी भागात १९९५ साली सहकाराचे रोपटे लावण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने केवळ जांबोटी भागातीलच नाही तर तालुक्यातील नागरीकांना काटकसरीची तर सवय लावलीच, पण व्यवसायासाठी त्यांच्या संस्थेने दिलेल्या कर्जातून अनेक व्यवसायीक निर्माण झाले, याचे समाधान बेळगावकर सर नेहमीच व्यक्त करतात.
जांबोटी को-ऑप क्रेडिट सोसायटीची स्थापना झाली. त्यानंतर ही चळवळ तालुक्याच्या प्रत्येक भागात पसरली. प्रत्येक मोठ्या गावात सहकारी संस्था उदयास आल्या. कृषी पत्तीन सहकारी संघ उदयास आले. तालुक्याला आर्थिक विकासाचा मार्ग सापडला. त्यातून तालुक्यातील शेती आणि व्यवसायात प्रगती झाली. तरूणांना उच्च शिक्षणासाठी जो हातभार लावला तो याच सहकारी संस्थांनी. तालुक्यातील सहकार चळवळीचा पाया रोवणाऱ्या जांबोटी मल्टीपर्पज सहकारी संस्थेने तीन दशकांपासून गरुडझेप घेतली आहे. संस्थेच्या खानापूर, बेळगाव आणि बैलूर येथे शाखा आहेत. तर कार्यक्षेत्रही दिवसेदिवस वाढत आहे. प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि पारदर्शक व्यवहार यामुळेच आम्ही यशस्वी झालो, असे बेळगावकर सर आणि त्यांचे संचालक सांगतात.
संस्था प्रगतीपथावर का?
- स्थापनेच्या प्रथम वर्षापासून सभासदांना नियमीत लाभांश.
- आतापर्यंत झालेल्या सर्व नऊ निवडणूका अविरोध.
- स्थापनेपासून आजतागायत संस्थापक विलास बेळगांवकर हे अविरोध अखंड बत्तीस वर्षे चेअरमन.
- सभासदांच्या गुणी पाल्यांचा दरवर्षी रोख रक्कम देऊन सन्मान.
- कोविड काळात व अतिवृष्टीत महापूर पिडीत लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.
- दुर्गम भागातील चिगुळे,पारवाड,कणकुंबी सारख्या अनेक गावांत शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.
- क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेशचे वाटप.
- .तालुक्यातील विविध साहित्य,सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांना नेहमी पाठबळ.
- रौप्य महोत्सवानिमित्त सभासदांना पंधरा ग्राम चांदीचे नाणे भेट. गुंफण साहित्य संमेलनाचे आयोजन,खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन,खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन.
- पारदर्शकव्यवहारातून विश्वासार्हता जपली आहे.
अशा या सामाजाभिमूख कार्यामुळे जांबोटी पतसंस्थेने प्रगती साधली आहे. आज या संस्थेच्या खानापूर शाखेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संस्थेच्या सर्व संचालकांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा..!
‘त्या’ अवैध रिसॉर्टमध्ये चालतंय काय? रम, रमा आणि रमी..
चेतन लक्केबैलकर / स्पेशल रिपोर्ताज What is going on at that illegal resort? आमटे येथील एका विनापरवाना रिसॉर्टमधील जलतरण तलावात बुडाल्याने महांतेश अशोक गुंजीकर (वय २७, खासाबाग-बेळगाव) या तरूणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.२९) घडली. या घटनेनंतर तालुक्यातील अशा विनापरवाना अवैध रिसॉर्टचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा या रिसॉर्टमध्ये अनेक अवैध प्रकार चालत असल्याचे […]