समांतर क्रांती / जांबोटी
खानापूर येथील इनरव्हील क्लबच्यावतीने जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य संदर्भात व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानाला विध्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन इन्नरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्रा.शरयू कदम, व्याख्यात्या सौ. पूजा गुरव, विदुला मणेरीकर, अश्विनी पवार यांच्या हस्ते झाले. पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी केले.
यावेळी बोलताना व्याख्यात्या पूजा गुरव म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी शरीराबरोबरच आपलं मानसिक स्वास्थ निरोगी ठेवणं गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक पोषक संतुलित आहार घेणे.नियमित व्यायाम, योगासन करणे. मोबाईलचा अतिरेक टाळणे, अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. यावेळी प्रा. शरयू कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी इन्नरव्हील क्लबच्या समृद्धी सुळकर, वर्षा देसाई, साधना पाटील, मधू हेरेकर, माधुरी खानापुरी, नमिता उप्पीन आणि माध्यमिक विद्यालयाचे शिक्षकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सुजाता चलवेटकर यांनी केले तर आभार संपदा तिरवीर यांनी मानले.
ब्युटी पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय; सहा जणींची सुटका
समांतर क्रांती / बेळगाव स्पा आणि ब्युटी पार्लरमध्ये राजरोस चाललेल्या वेश्या व्यवसायावर सीईएन पोलिसांनी छापा मारून सहा जणींची सुटका केली आहे. या प्रकरणी ब्यटी पार्लरच्या मालकिणीला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार अनगोळ बेळगाव येथील मुख्य रस्त्यावरील अंजली स्पा आणि ब्युटी पार्लरमध्ये उघडकीस आला. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सीईएन पोलिस स्थानकाचे […]