खानापूर: म.ए.समितीतून आमदार व्हायचे आणि आपले इस्पित साध्य झाल्यानंतर स्वार्थासाठी राष्ट्रीय पक्षांच्या वळचणीला जायचे. हे तुमचे राजकारण असेल तर आम्ही कांही चुकीचे केलेले नाही. तालुक्याचा विकास आणि तालुक्यातील स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आम्ही काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या सोबत आहोत, जनतेनेदेखील यावेळी विरोधकांना चारीमुंड्या चित्त करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या जीवावर पेन्शन घेणाऱ्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये, असा घणाघात यशवंत बिर्जे यांनी कबनाळी येथील सभेत केला.
कबनाळी येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरूवात झाली आहे. यानिमित्ताने आयोजीत कार्यक्रमात यशवंत बिर्जे बोलत होते. विठ्ठलाच्या भूमीतून आलेल्या डॉ. अंजली निंबाळकर खानापूर तालुक्याचा विकास करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. आमदारकीच्या काळात त्यांनी तालुक्यात अनेक महत्वाकांक्षी योजना आणल्या. दिल्लीच्या संसदेत गेल्यानंतर नक्कीच त्या कबनाळीसारख्या गावांच्या समस्या सोडवतील, हा विश्वास ठेवून त्यांना यावेळी विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलतांना ग्रा.पं.युनियनचे अध्यक्ष विनायक मुतगेकर म्हणाले, खासदार हेगडेंच्या अपयशाचे उत्तर खानापूर तालुक्यातील नेते देऊ शकत नाही. आणि हिम्मत असे तर बाजप नेत्यांनी जनतेसमोर त्याचे स्पष्टीकरण द्यावे. तब्बल ३० वर्षे केवळ धर्म आणि मोदींच्या नावानर तालुक्यातील जनतेला नागविले गेले, तेव्हा या भाजपच्या नेत्यांना त्यांच्या खासदारांना जाब विचारता आला नाही. आता हेच नेते पुन्हा खोटे आरोप करीत लोकांची फसवणूक करीत आहेत. त्यांना दारातही उभे करून घेऊ नका.
डॉ. अंजली निंबाळकर यांना बाहेरच्या उमेदवार म्हणून मतदान करू नका असे भाजप नेते सांगत सुटले आहेत. प्रत्यक्ष बाहेरचा उमेदवार कोण हे जनतेला माहीत आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच खानापूर तालुक्याला राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी मिळाली आहे. त्यासाठी डॉ. अंजली निंबाळकर यांना विजयी करून दिल्ली दरबारी पाठवून देत समस्या सोडवून घेण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे मत मुतगेकर यांनी मांडले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीताराम राणे होते. विविध देवदेवतांच्या प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विचारपिठावर रमेश पाटील, राजेश पाटील, सहदेव दळवी, जयवंत गावडे, दत्तू देसाई, पुन्नाप्पा बिर्जे, संजय कांबळे विठ्ठल सावंत आदी उपस्थित होते. ग्रा.पं.माजी अध्यक्ष राजाराम धुरी यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर डॉ. निंबाळकर समर्थकांनी घरोघरी जाऊन प्रचार केला.
कारवार लोकसभा: खानापुरातून आणखी एक उमेदवारी अर्ज
खानापूर: काल शेवटच्या दिवशी उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघात खानापुरातून आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. म.ए.समितीचे नेते अविनाश पाटील (मणतुर्गे) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यांच्या सोबत माजी नगरसेवक विजय पाटील, प्रदिप पाटील, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते. खानापूर तालुक्यातून काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर, म.ए.समितीचे निरंजन सरदेसाई, राजशेखर हिंडलगी, के.पी. पाटील यांनी […]