परेश मेस्ता प्रकरणावरून हिंदुत्वावादी श्रीराम जादुगर यांचा हल्लाबोल
कारवार: परेश मेस्ता प्रकरणी हिंदू कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपचा एकही नेता मदतीला आला नाही. भाजप आणि निजद युतीचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी हे आग लावून पळून गेले. सर्वसामान्य हिंदू तरूण मात्र यात हकनाक गोवले जाऊन त्यांचे संसार उध्वस्त झाले. कागेरींनी राजकीय लाभ घेतला, पण या प्रकरणातील एकाही हिंदू तरूणाला ते पुन्हा कधी भेटले नाहीत. आता ते पुन्हा हिंदूत्वाच्या नावाखाली राजकारण करीत आहेत. त्यांना स्वत:ला हिंदू म्हणून घेतांना लाज कशी वाटत नाही, अस सवाल हिंदू कार्यकर्ते श्रीराम जादुगर यांनी उपस्थित केला आहे. Kageris should be ashamed to call themselves Hindu.
कारवार येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, परेश मेस्ता प्रकरणी सुमारे ९५ तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आम्ही अजूनही कोर्ट कचेरी करत फिरत आहोत. पण भाजपचा एकही नेता आमच्या मदतीला आला नाही. निवडणूक आली की परेश मेस्ता यांचे प्रकरण डोळ्यासमोर येते. या प्रकरणात कागेरींनी आम्हाला काय मदत केली ते स्पष्ट करावे. राजकीय फायद्यासाठी ते आमचा वापर करत असून आम्हाला खूप वाईट वाटते की, आम्ही यांच्या भुलथापांना बळी पडलो.
परेश प्रकरणात तत्कालीन आयजीपी आणि सध्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक हेमंत निंबाळकर यांनी पुरावे नष्ट केल्याचा कागेरींचा दावा आहे. तसे असेल तर तपास नीट व्हावा, यासाठी कागेरींनी किती पत्रे लिहिली? या खटल्याबद्दल त्यांनी किती जणांशी चर्चा केली? निवडणूक आली की भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी परेश मेस्ता प्रकरणाचे कार्ड वापरत आहेत. खरंतर या प्रकरणात कागेरींनाच अटक व्हायला हवी होती. आता तरी तुमच्या राजकीय फायद्यासाठी गरीब तरूणांचा वापर करू नका, असे आवाहन जादूगर यांनी केले.
मागच्या भाजप सरकारात सभापती राहिलेल्या कागेरींनी आमच्यासाठी काय केले? सात वर्षांपासून आम्ही न्यायालयाच्या चकरा मारत आहोत. हिंदू कार्यकर्ते म्हणून आम्ही आता निश्चिंत आहोत. निवडणुकीसाठी आम्हाला पुन्हा राजकारणात ओढू नका. परेश मेस्ता यांची हत्या झाली तेव्हा आम्ही दंगलीत सहभागी होतो, असा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर ते प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले, तेव्हा केंद्रात भाजपचे सरकार असतानाही न्याय मिळाला नाही. आता ते आमचा निवडणुकीसाठी वापर करत आहेत. पण तरूणांनीदेखील त्यांच्या खोट्या बतावणीला बळी पडू नये. तुम्हाला सोयीचा वाटेल, त्या पक्षाला मतदान करा, असे ते म्हणाले.
आणखी एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते नित्यानंद पालेकर म्हणाले, समाजाच्या भल्याचा विकासाचा विचार ठेवून राजकारण करा. द्वेष निर्माण करणारे आणि एकमेकांशी भांडण करणारे राजकारण करू नका. तसे झाल्यास आम्ही उघडपणे कागेरींना विरोध करू. जातीय दंगली भडकवण्याऐवजी विकासासाठी काम करा, असे कान टोचले. पत्रकार परिषदेत हिंदू संघटनांचे विक्रम, राम, नित्यानंद पालेकर, नागराज, प्रदीप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
- आमदार दिनकर शेट्टीही हात झटकले
- आमदार दिनकर शेट्टी यांनी या प्रकरणात आम्हाला कसलीही साथ दिली नाही. आम्ही होन्नावर मतदारसंघातील नागरिक आहोत. आमचे आमदार दिनकर शेट्टी यांनीही परेश मेस्ता प्रकरणाचा फायदा घेतला. दिनकर शेट्टी आमदार असताना भाजपची सत्ता आल्यानंतरही २०२० मध्ये आमच्याविरोधात कलम १०७ अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती. आम्ही आमदार शेट्टी यांच्याकडे जाऊन विचारणा केली तेव्हा या प्रकरणाचा आपल्याशी काही संबंध नाही, असे सांगत हात वर केले. भाजप हा खोटारड्यांचा पक्ष असून त्यांच्या नादाला लागून तरूणांनी आपले आयुष्य बरबाद करून घेऊ नये, असे आवाहन केले .
परेश मेस्ता प्रकरणी तक्रार दाखल झाल्यापासून आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला आहे. कामासाठी परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट काढणेही शक्य नाही. आमच्या कुटुंबियांचे अश्रू पुसायला कोणी नाही. या सगळ्याला जबाबदार कोण?
- श्रीराम जादूगार, होन्नावर
खानापुरातील भाजपच्या ‘त्या’ नेत्यांवर कारवाई व्हायलाच हवी
खानापूर: कोरोना महामारीच्या काळात जनतेला किट पोहचविले नसल्याचा आरोप करीत या प्रकाराला माजी आमदारांना जबाबदार धरून भाजपच्या नेत्यांनी चुकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यासंदर्भात इंटरसेलच्या अध्यक्षा लक्ष्मी पाटील यांनी खुलासा करतांना हा आरोप बिनबुडाचा आणि जाणीवपूर्वक केला जात असून भाजपच्या ‘त्या’ नेत्यांवर कारवाई झाली पाहीजे, असे मत व्यक्त केले आहे. कोरोना महामारीच्या काळात भाजपच्या […]