
कालमणी शाळेचा अमृत महोत्सव उत्साहात
समांतर क्रांती / जांबोटी
शिक्षण माणसाला शहाणपण देते. गेल्या ७५ वर्षांपासून कालमणीची मराठी शाळा या परिसरातील लोकांना शहाण करीत आली आहे. त्यामुळे या शाळेचा अमृत महोत्सव साजरा होणे ही या शाळेच्या ॠणातून उतराईच आहे, असे प्रतिपादन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले.
नुकताच कालमणी येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यापित्यर्थ्य अमृत महोत्सवाचे जंगी आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सिध्देश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल कालमणकर होते. यावेळी व्यासपिठावर माजी आमदार अरविंद पाटील, काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर, प्रकाश पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष कृष्णा भरणकर व शिवाजी सावंत यांनी स्वागत केले. तर सत्यदेव नाईक यांनी प्रास्ताविक करून अमृत महोत्सवाच्या आयोजनामागील हेतू स्पष्ट केला. माजी आमदार अरविंद पाटील, काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर, सरकारी ठेकेदार प्रकाश पाटील, क्षेत्र शिक्षणाधिकारी पी. रामाप्पा, क्षेत्र संपन्मूल व्यक्ती ए.आर. अंबगी यांच्याहस्ते दीपप्रज्वलन तसेच विविध प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बी.एम.यळ्ळूर यांच्या हस्ते ज्ञानामृत कुंभ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी शाळेत सेवा बजावलेल्या आजी-माजी शिक्षकांचा सत्कार आयोजकांतर्फे करण्यात आला. अमृत महोत्सवाचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहभोजनाने समारंभाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिध्देश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल कालमणकर यांच्यासह त्यांच्या सहकऱ्यांनी परिश्रम घेतले.

खानापुरात काँग्रेस जोमात; भाजप कोमात
समांतर क्रांती / स्पेशल रिपोर्ट तालुक्यातील राजकारणाने सध्या गय खाल्ली आहे. एकीकडडे तालुक्यातील सत्ताधारी भाजपाकडे कांहीच कार्यक्रम नाही; शिवाय सर्वसामान्यांच्या समस्यांशी त्यांना कांही देणे-घेणे राहिले नाही. त्याउलट काँग्रेसने मात्र भलतेच जोमात असल्याची प्रचिती गेल्या कांही महिन्यांपासून तालुकावासीयांना येत आहे. भाजपचे आमदार विठ्ठल हलगेकर आणि त्यांच्या पक्षांच्या अपयशाचा आलेख दिवसेदिवस चढत चालला असतांना काँग्रेसींचा उत्साह मात्र […]