समांतर क्रांती / खानापूर
Belgaum youth dies after drowning in swimming pool at resort near Kankumbi. कणकुंबीजवळील एका रिसॉर्टमध्ये जलतरण तलावात बुडून खासबाग-बेळगावच्या महांतेश अशोक गुंजीकर (२७) या तरूणाचा रविवारी मृत्यू झाला होता. तो अपघात नसून घातपात असल्याचा संशय त्याचे वडील अशोक तम्मान्ना गुंजीकर यांनी व्यक्त केला आहे. तशी फिर्याद खानापूर पोलिसात नोंद झाली आहे.
शनिवारी मयत महांतेश याच्यासह एकाच कंपनीतील २२ तरूण फिरण्यासाठी जांबोटी – कणकुंबी भागात गेले होते. शनिवारी जंगलात फिरल्यानंतर ते तरूण त्यादिवशी ‘त्या’ रिसॉर्टमध्ये राहिले. रविवारी २९ रोजी महांतेश याला सायंकाळी त्याच्या मित्रांनी अत्यवस्थ आवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. रविवारी रात्री उशिरा वडील अशोक यांनी खानापूर पोलिसात फिर्याद नोंदविली. मुलाचा घातपात झाला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यादिवशी रिसॉर्टमध्ये नक्की काय घडलं? याचा तपास खानापूर पोलिस करीत आहेत.
न बोलता जगासमोर आदर्श ठेवणारे पंतप्रधान..
कृती शब्दांपेक्षा मोठी असते; अशाप्रकारे ज्यांनी सर्वाधिक टीका सहन करून सर्वाधिक काम करून दाखवणारे नव्या भारताचे शिल्पकार म्हणजे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग.त्यांचे नुकताच निधन झाले. त्याबद्दल त्यांना वाहिलेली ही शब्द सुमनांजली..! ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलण्याइतपत आपण मजबूत आहोत, याचे कारण डॉ.मनमोहन सिंग. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीद्वारे गाव-खेड्यातील गोरगरिबांना १०० दिवसांचा रोजगार मिळवून देण्याच्या […]