रायचूर: सिद्धरामय्या हे सध्या मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच येत नाही. मला अजून वाट पाहावी लागेल, मी 2028 साठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार असल्याचे सांगितले मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.रायचूर येथे पत्रकारांशी बोलताना, कोणतीही गुप्त बैठक झाली नाही. सर्वांनी मिळून जाहीरपणे बैठक घेतली, गुप्त बैठकीचा प्रश्नच येत नाही. ती फक्त दुपारच्या जेवणाची बैठक होती. बैठकीत मुख्यमंत्री बदलाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. सध्या मंत्रिमंडळ विस्तार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.
खानापूर जवळ अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू
समांतर क्रांती / खानापूर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातातील जखमी तरुणाचा उपचारदरम्यान आज सोमवारी (ता. 6) मृत्यू झाला. काल रविवारी (ता. 5) सायंकाळी पाच वाजता खानापूर -बेळगाव महामार्गावर गणेबैलजवळ हा अपघात घडला होता. यात दोन तरुण जखमी झाले होते. त्यापैकी विक्रम मारुती पाटील (33,रा. बहाद्दरवाडी, बेळगाव) याचे आज उपचारादरम्यान निधन झाले. त्याच्या पश्चात आई वडील, […]