बंगळूर: राज्यात यावेळी सत्तापालट होणार असल्याचे एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. खासगी वृत्तवाहिनी आणि सी व्हॉटर्स यांच्या मतदानपूर्व संयुक्त सर्वेक्षणात हा अंदाज व्यक्त करण्यात आला असून एकूण 224 जागांपैकी भाजपला 79 ते 89, काँग्रेसला 106 ते 116, निजद 24 ते 34 आणि इतर 0 ते पाच जागा पटकवतील, असा निष्कर्ष या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
बेळगावचे काय?
उत्तर कर्नाटकातील 50 जागांपैकी 21 भाजपकडे, 29 काँग्रेसकडे तर निजद व इतरांकडे प्रत्येकी एक जागा असेल. बेळगाव जिल्ह्यातील 18 पैकी बहुतांश म्हणजे 10 जागांवर काँग्रेसचे वर्चस्व असेल असे या अहवालात म्हटले आहे. मराठीबहुल भागात भाजपला खिंडार पडणार असून म.ए.समितीला संधी मिळेल, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
One thought on “राज्यात सत्तापालट, काँग्रेस येणार सत्तेवर? बेळगावचे काय?”