बेळगाव: 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी शेजारील गोव्यातून भाजप नेत्यांची फौज दाखल होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह पाच मंत्री आणि नऊ नेते प्रचारात सहभागी होणार आहेत.
यावेळी भाजपने निवडणूक गांभीर्याने घेतली असून प्रचारात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत, यासाठी केंद्रीय कार्यकारिणी सतर्क झाली आहे. दरम्यान, निवडणूक प्रचारासाठी विविध राज्यातील नेत्यांना सूचना करण्यात आली आहे. शेजारील गोव्यातून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल, वाहतूक मंत्री माविन गुदीन्हो, जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्यासह आमदार मायकल लोबो, माजी आमदार सिद्धार्थ कुंकल्येकर, वकील नरेन्द्र सावईकर, दामू नाईक, प्रेमेंद्र शेट, उल्हास तुयेकर, दाजी साळकर, प्रवीण अर्लेकर, केदार नाईक हे निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत.
मंत्री विश्वजित राणे हे अस्खलित कन्नड बोलतात, त्यामुळे त्यांच्यावर उत्तर कन्नड जिल्ह्यातील सहा मतदार संघांच्या प्रचार नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते ११ एप्रिलपासूनच या मतदार संघात ठाण मांडून राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.karnataka elections
खानापुरातून हलगेकर, बेळगाव उत्तर-ग्रामिणमध्ये नवे चेहरे
खानापुरातून हलगेकर, बेळगाव उत्तर-ग्रामिणमध्ये नवे चेहरेनवी दिल्ली: अखेर आज रात्री भाजपने १८९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.बेळगाव उत्तर: डॉ. रवी पाटीलबेळगाव दक्षिण: अभय पाटीलबेळगाव ग्रामीण: नागेश मनोळकरखानापूर: विठ्ठल हलगेकरकित्तूर: दोड्डगौडरबैलहोंगल: जगदीश मेटगुडसौंदत्ती: रत्ना मामनीरामदुर्ग: दुर्योधन ऐहोळेकुडची: पी.राजीवअथणी: महेश कुमठळीकागवाड: श्रीमंत पाटीलहुक्केरी: निखिल कत्तीनिपाणी: शशिकला जोल्लेअरभावी: भालचंद्र जारकीहोळीगोकाक: रमेश जारकीहोळीचिकोडी-सदलगा: रमेश कत्तीयामकनमर्डी: बसवराज हुंदरी