कारवार: लोकसभा निवडणुकीसाठी २० जणांनी ३६ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १४ जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले असून सहा जणांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. उद्या सोमवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.एकुण उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर या एकमेव महिला आहेत. होन्नावरच्या रुपा गजानन नाईक यांनीही अर्ज दाखल केला होता, मात्र शनिवारी (ता.२०) झालेल्या छाणणीत त्यांचा अर्ज अवैध ठरला.
काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर, भाजपचे विश्वेश्वर हेगडे, म.ए.समितीचे निरंजन सरदेसाई, अविनाश पाटील, कृष्णा बळेगार, कर्नाटक राष्ट्र समितीचे विनायक नाईक, अरविंद गौडा, राजशेखर हिंडलगी, के.पी.पाटील, कम्युनिस्ट पक्षाचे गणपती हेगडे, उत्तमा प्रजाकीया पार्टीचे सुनिल पवार, नागराज शिराळी, चिदानंद हरिजन यांचे अर्ज वैध ठरले आहेत.
राष्ट्रीय जनसंभावना पार्टीचे नागराज श्रीधर शेट, उमेश दैवज्ञ, रुपा नाईक, प्रकाश पिंटो, सुजय गोकर्ण, प्रमोद मडगावकर यांचे अर्ज निवडणूक अधिकारी गंगुबाई मानकर यांनी अवैध असल्याचे जाहीर केले. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून १४ जणांपैकी कोण माघार घेणार आणि किती उमेदवार रिंगणात राहनार याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.
भाजपची अश्वासने खोटी, काँग्रेसच्या विजयाची ‘गॅरंटी’ मोठी
गर्लगुंजी परिसरात तरूण उतरले प्रचारात, डॉ. निंबाळकरांना विजयी करण्याचे आवाहन खानापूर: लोकसभा निवडणुकीत भाजपला हद्दपार करण्याचा चंग काँग्रेससह तालुक्यातील जनतेने बांधला आहे. काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचारासाठी गर्लगुंजी भागातील तरूण प्रचारात गुंतले आहेत. शेत-शिवारात जाऊन हे तरूण मतयाचना करीत आहेत. तसेच राजगार हमी योजनेच्या कामावर जाणाऱ्या महिलांचीदेखील भेट घेऊन यावेळी डॉ. अंजली निंबाळकर […]