स्पॉटलाईट / चेतन लक्केबैलकर
आई-वडिलांचा विरोध डावलून आधी पळून जाऊन प्रेमविवाह केला. दोन मुलं झाली. पण, कांही वर्षातच पुन्हा दुसरे सावज जाळ्यात सापडताच पोटच्या गोळ्यांना पतीच्या हवाली करून पत्नीने प्रियकरासोबत धूम ठोकली. अगदी चित्रपटाच्या पटकथेला साजेल अशी घटना खानापूरपासून जवळच असणाऱ्या एका खेड्यात घडू शकते, यावर नक्कीच कुणाचा विश्वास बसणार नाही. पण, हे घडलंय. तेही पोलिसांच्या साक्षीने!
खानापूर-नंदगड मार्गावरील एका गावातील तरूणींने आई वडिलांचा विरोध डावलून तिच्या आवडीच्या मुलाशी प्रेमविवाह केला. नव्याचे नऊ दिवस संपले तसे तीने भांडण उकरून काढायला सुरूवात केली. दरम्यान, दोन मुलांची आईही झाली. एक दिवस पुन्हा आई वडिलांच्या आडोशाला आली आणि दुसऱ्या अध्यायाची सुरूवात झाली.
नंदगड भागातील एका परिचित गावातील एका तरूणाशी तिचे सूत जुळले. पुन्हा एकदा ती प्रेमात पडली, पण हे प्रेम नसून व्यभिचार असल्याचे समजण्याच्या पलिकडे तिची मजल गेली. पतीने कशीतरी समजूत काढून तिच्याशी संसार करण्याची तयारी दर्शविली. पण, त्याचे प्रयत्न फोल ठरले. शरीरसुखाला हपापलेल्या आणि चटावलेल्या तिने पुन्हा तोच कित्ता गिरविण्यास सुरूवात केली. डोक्यावरून पाणी वाहू लागल्यानंतर नवऱ्याने हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचविले. गुप्त खलबते झाली आणि तिने ‘त्याच्या’सोबत राहण्याचे नक्की केले. पती आणि पोटच्या मुलांना सोडून तिने त्याचा हात धरला आणि नौ दो ग्यराह झाली. त्यासाठी तिने करारपत्रावरही बिनदिक्कत सही केल्याचे समजते. हा सगळा प्रकार पोलिस स्थानकात घडला. तिच्या वागण्याने पोलिसही अचंबीत झाले होते. विशेष म्हणजे तिला दुसऱ्यांदा नवऱ्यासमोरून पळविणारा तो तरूण मात्र अविवाहित असल्याचे समजते. या प्रकरणाची सध्या परिसरात खरपूस चर्चा सुरू आहे.
मास्टरमांईंड कोण?
खानापूर-नंदगड मार्गावरील रस्त्यावर असलेल्या याच गावातील एका महिलेने अनेक विवाहित महिला आणि तरूणींना सावज बनविल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. सदर महिलेने जणू ‘व्यवसाय’च सुरू केला आहे. कॉलेज तरूणी आणि विवाहित महिलांना अमिषे दाखवून त्यांना वाममार्गाला लावण्यात या ‘खाल मुंडी, पाताळ धुंडी’ महिलेचा हात आहे. तिचा वावर शहरातही राजरोसपणे असून तिच्या सालस आणि मृदू स्वभावामुळे तिच्याबद्दल कुणालाही संशय येत नसल्याचा गैरफायदा तिने उठविला. तिच्या जाळ्यात सापडलेल्या अनेकींच्या संसारावर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर कांही सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. पण तो फोल ठरल्याचे सांगितले जात आहे. अशा प्रकरणात कोण-कोण हात धुवून घेत आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाजपच्या युवा नेत्यांने तरूणांना का चोपले?
शहरातील भाजपच्या युवा नेत्याने पाच तरूणांना बेदम चोप दिल्याची घटना नुकताच घडली. शहरात त्या घटनेचे चर्वीतचर्वण जोरात सुरू आहे. ही मारहाण का झाली? यामागेही एक रंजक कहाणी आहे. एका तरूणींचा विनयभंग (की आणखी कांही?) केल्याचे हे प्रकरण असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे. दरम्यान, यात शहरातील मटकाकिंग, गांजा आणि तत्सम नशीले पदार्थांचे सप्लायर यांचा सहभाग या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखीत करणारा असल्याने शहाण्यासुरत्यांनी यापासून दोन हात दूर राहण्याचाच प्रयत्न चालविला आहे. पोलिसांना याची कल्पना नाही, असे अजिबात नाही. पण, सगळेच हात एकमेकांत गुंतले आहेत. पालक मात्र हतबल झाले आहेत.
लगिनघाई सुरू असतांना वधुपित्याचा अपघाती मृत्यू
बेळगाव: मुलीचे लग्न आवघ्या सहा दिवसांवर असतांना वडिलांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने गर्लगुंजी गावावर शोककळा पसरली आहे. अरूण मष्णू पाटील (वय ४५, रा.गर्लगुंजी) असे त्यांचे नाव असून गुरूवारी लग्नपत्रिका वाटून घरी परततांना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने ठोकरल्याची घटना सुळगा येथे घडली. घरात लगिनघाई सुरू होती. लग्न अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपल्याने अरूण हे नातेवाईकांना पत्रिका […]