
समांतर क्रांती / विशेष (पूर्वार्ध)
गेल्या महिनाभरात खानापूर तालुक्यात अनेक स्थित्यंतरे घडलीच. त्यातही रामगुरवाडीच्या हुडगम्मा आणि सातेरी माऊली देवीच्या यात्रेने सुरू झालेला महोत्सवांचा सिलसिला नंदगड आणि सन्नहोसूर येथील महालक्ष्मी यात्रेने ओसरला. त्यातही अनेक ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटनांनी या महिन्यावर काळाची पडछाया दिसून आली.
नंदगडची वेगळा संदेश देणारी यात्रा..
नंदगड गावाने आणि या परिसराने समाज परिवर्तनाची नेहमीच कास धरली. परंपरा तर जपाव्याच लागतात. त्यामुळे यंदा २४ वर्षांनी नंदगडात महालक्ष्मीच्या यात्रेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. सुरूवातीला शासकीय-प्रशासकीय बेमुवर्तपणामुळे विकास कामांची बोंबाबोंब झाली खरी. पण, १२ तारखेला प्रत्यक्ष यात्रा सुरू झाल्यानंतर मात्र सर्व कांही सुरळीत पार पडले हे विशेष.
नंदगडच्या यात्रेचे वैशिष्ठ्य म्हणजे १३ दिवसांच्या काळात तब्बल सात दिवस दारू मटणाला फाटा देण्यात आला होता. एरवी, यात्रेच्या पहिल्या दिवसांपासून चंगळवादाला सुरूवात होत असते. पण, नंददगडकरांनी जपलेली परिवर्तनवादी वाटचाल वाखाणण्याजोगीच ठरली. त्यातही यंदाच्या यात्रेत गदगेच्या मंदिराची आयोध्देतील श्रीराम मंदिराची पृतिकृती बनवून भाविकांना आयोध्देची सफरही घडवून आणली. कोट्यवधींचा खर्च या यात्रा काळात झाला. सर्वसामान्य माणूस लाखोंच्या कर्जाखाली दबला गेला तरी यात्रेतील उत्साहात कुठेच वजाबाकी झाल्याचे दिसले नाही. थोडक्यात तालुक्यातील ही यात्रा विनासायास निविघ्नपणे पार पडली.
याच काळात सन्नहोसूर- भंडरगाळी येथील यात्राही वैशिष्ठ्यपूर्णरित्या पार पडली. प्रतितालुक्याचे ठिकाण असलेल्या नंदगडकडेच सर्वांनी लक्ष वेधले असतांना या दोन्ही गावातील यात्रेला आवकळा येईल, असे वाटत होते. पण, दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी तितक्याच मेहनतीने यात्रा यशस्वीपणे आणि उस्त्फूर्द उत्साहात पार पाडली.
शिवजयंती-शिवरात्रीचा उत्साह
एकीकडे यात्रांचा सुकाळ सुरू असतांनाच तालुक्यातील शिवप्रेमींनी १९ फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली. त्यानंतर लागलीच महाशिवरात्रीनिमित्त तालुक्यातील शीवालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून पारंपारीक उत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने तालुक्याची जीवनदायिणी मलप्रभेचा काठ अक्षरश: गजबजून गेला होता.
यात्रा – जत्रांबरोबरच महिन्याच्या उत्तरार्धात शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या रेलचालीनेदेखील तालुक्यात नवे अध्याय निर्माण केले. येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानने सालाबादप्रमाणे तालुक्यातील विद्यार्थ्यासाठी सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन केले. विशेष म्हणजे यावेळी या स्पर्धेला उच्चांकी प्रतिसाद लाभला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांची ही पोचपावती होती. त्यानंतर लागलीच २७ फेब्रूवारी रोजी प्रतिष्ठानने मराठी भाषा दिन उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाला गोव्यातील जेष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे यांनी प्रमुख वक्ते म्हणून संबोधीत करतांना गोवा आणि सीमाभागातील मराठी भाषिकांची तुलनात्मक व्यथा मांडतांना सीमावासीयांनी खऱ्या अर्थाने मराठी जगविल्याबद्दल प्रशंसा केली. शिवाय प्रतिष्ठानच्या प्रयत्नांबद्दल शाबसकीही दिली.

याचदिवशी कालमणी येथील मराठी प्राथमिक शाळेचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला जिल्हाभरातील नेते आणि महाराष्ट्र – गोव्यातील मान्यवर कलावंत – विचारवंत उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सिध्देश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष अनिलराव कालमणकर आणि शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष कृष्णा भरणकर यांनी प्रयत्नांची परिश्रम घेतले.
याच दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्ताने माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी पती अतिरिक्त पोलिस महासंचालक हेमंत निंबाळकर यांच्यासमवेत प्रयागराजमध्ये जाऊन महाकुंभ मेळ्यात सहभाग घेतला. तसेच अभ्यंग्यस्नान केले.
शहराच्या विकासाला चालना
येथील नगर पंचायतीवर कारभाऱ्यांची निवड झाल्यानंतर आता शहरातील विकास कामांना चालना मिळाली आहे. तसेच नगराध्यक्षांनी शहराच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांना तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांची साथ लाभत असल्याचे नुकताच झालेल्या विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमातील त्यांच्या उपस्थितीने अधोरेखीत केले.
निवड आणि नियुक्ती..
येथील बहूचर्चीत खानापूर को-ऑप बॅंकेच्या चेअरमनपदी अपेक्षेप्रमाणे अमृत शेलार यांची तर व्हा. चेअरमनपदी मेघशाम घाडी यांची निवड झाली. त्यांचे आता सर्वत्र अभिनंदनपर सन्मान होत आहेत. त्याचप्रमाणे येथील खानापूर तालुका मल्टीपर्पज सोसायटीच्या अध्यक्षपदी सौ. धनश्री कर्णसिंह सरदेसाई-जांबोटीकर यांची अभिनंदनीय निवड झाली. नुकताच या पतसंस्थेची निवडणूक अविरोध पार पडली होती.
पुढील भागात.. काय बिघडलं?

असाही वाढदिवस.. मेनबत्ती विझवून नव्हे..
समांतर क्रांती / खानापूर हल्ली मुलांचे वाढदिवस हटके स्टाईलने साजरे करण्याच्या नादात त्याचे उत्सवीकरण झाले आहे. चंगळ आणि पैशांची फुकटची उधळण ही ‘इमेज स्टेटस’ बनली असतांना मणतुर्गा येथील पुरोगामी विचारांचे पाईक आणि काँग्रेसचे नेते ईश्वर बोबाटे यांनी त्यांचा चिरंजीव सार्थकचा वाढदिवस पारंपारिक पध्दतीने साजरा केला. केक कापणे एकवेळ ठिक आहे, पण मुलाला केकचा घास भरविण्यापूर्वी […]