
समांतर क्रांती / विशेष (उत्तरार्ध)
महिनाभरात अनेक चांगल्या घटना तालुक्यात घडल्या. यात्रा-जत्रांसह शैक्षणिक आणि सामाजिक-सास्कृतिक कार्यक्रमांचा धुरळा उडत असतांनाच अनेक वेदनादायी घटनादेखील या महिन्यात घडल्या.
सीमालढ्याच्या दृष्टीने एकीकडे कांही चांगल्या बाबी घडल्या तर माजी आमदार कै. व्ही.वाय.चव्हाण यांच्या पत्नी अन्नपूर्णा चव्हाण यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. तसेच नंदगड येथील सीमासत्याग्रही पुंडलीकराव चव्हाण यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी ऐन यात्रा काळातच निधन झाले. या दोन्ही घटना समितीच्या नेते-कार्यकर्त्यांना वेदना देणाऱ्या होत्या. शोकसभेच्या आयोजन करून खानापूर तालुका म.ए.समितीने त्यांना श्रध्दांजली वाहिली. तसेच त्यांच्या आठवणीना उजाळा दिला.
जांबोटी येथील नाट्यकर्मी विष्णू अप्पाजी सडेकर यांचे जाणे सुध्दा चटका लावणारे आहे. ते प्रसिध्द नाट्य दिग्दर्शक आणि कला क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तित्व होते. त्यांच्या निधनाने या क्षेत्राची अपरिमीत हानी झाली आहे.
शेतकऱ्यांचा दुर्दैवी अंत..
कारलगा येथे शेतीत लागलेली आग विझवतांना तुकाराम रवळू पवार (७५) या शेतकऱ्याचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना चटका लावून गेली. नेरसा येथील कर्जबाजारी शेतकरी नीलेश हैबतराव देसाई (४७) यांनी गळफास लाऊन आत्महत्या केली. शेतकऱ्यांच्या अशा दुर्दैवी अंताने तालुका हादरला असतांनाच हत्तींनी पुन्हा तालुक्यात प्रवेश केल्याच्या घटनेने खळबळ उडवून दिली. निट्टूर येथे हत्तींनी महामार्ग ओलांडला. त्यांचा मुक्काम वाढणार हे निश्चित झाल्याने शेतकऱ्यांसह वनखात्याचीदेखील डोकेदुखी वाढली आहे.
नंदगडात दुर्घटना..
यात्रा सुरू होताच नंदगडात अनेक दुर्घटनांनी लक्ष वेधून घेतले. जनता कॉलनीत रघुनाथ मादार यांच्या घरी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. केवळ सुदैवाने यात जिवीतहानी टळली. महिन्याच्या अंताला २७ रोजी नंदगड विठोबा गल्लीतील रामकृष्ण बाळू हुंदरे (२४) या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हेब्बाळ जलाशयात उडी घेऊन विष्णू जयराम गोंधळी (६८) यांनी आत्महत्या केल्याची घटना दोनच दिवसांपूर्वी घडली. त्यांनी नैराश्येतून हे पाऊल उचललेले. याशिवाय किरकोळ अपघाताच्या घटनांनीदेखील हा महिना गाजला.
दिलासादायक असेही कांही..
महामार्गावर काटगाळी क्रॉसनजीक अपघातात जखमी झालेल्या माकडाला संवेदनशील नागरिकांनी वाचविले, ही घटना दिलासादायक ठरली. तर खानापूर शहरातील गुरव गल्लीतील शीवप्रेमी तरूणांनी ‘छावा’ चित्रपटाचे मोफत प्रदर्शन करून एक वेगळा परिपाठ घालून दिला.
हलगा येथील बहुचर्चीत ग्राम पंचायत घोटाळ्यात महाबळेश्वर पाटील यांना अध्यक्ष पदावरून पायउतार करण्यात सदस्यांना मिळालेले यश हे तालुक्यातील घोटाळेबाजांना इशारा देणारे ठरले.
एकंदरच, या महिनाभरात अनेक दु:खद आणि वेदनादायक घटनासह कांही दिलासादायक घटनादेखील घडल्या. सीमाभागाला समन्वयमंत्री मिळाले. युवा समिती नेते शुभम शेळके यांना जामिन मंजूर झाला तर येळ्ळूर प्रकरणात अनेकांची निर्दोष मुक्तता झाली.
समाप्त..

.. म्हणे विकास केला! १५२ कि.मी. रस्ता कच्चा..!
समांतर क्रांती / विशेष खानापूर तालुक्याच्या विकासाचे ढोल वाजविणाऱ्या नेत्यांसनसनीत चपराक देणारी रस्त्यांच्या दुरवस्थेची आकडेवारी समोर आली आहे. तालुक्यात आजघडीला तब्बल १५२. ४० कि.मी. अंतराचे रस्ते कच्चे आहेत. रस्त्यांचा विकास केल्याचा डांगोरा पिटत सत्तेची पोळी चाखणाऱ्यांनी केवळ रस्त्यांच्या चिखलात लोळण्याव्यतिरिक्त कांहीच केले नाही, याची प्रचिती देणारी शासकीय आकडेवारी समोर आली आहे. जिल्हा पंचायतीकडून दर […]