
समांतर क्रांती / खानापूर
तालुक्यात गेल्या दोन-चार दिवसांत कुत्र्यांच्या हल्ल्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. आज तर बिडीत एका बालिकेवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून कानाचा चावा घेतल्याच्या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. दोन दिवसांपूर्वीच निट्टूर येथे सुध्दा एका कॉलेज तरूणीवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. अशा घटनांनी सध्या तालुक्यात घबराट पसरली आहे.
आज बिडी येथे आराध्या रमेश काळे या चार वर्षाच्या मुलीवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून कान पूर्णपणे चावून काढला आहे. तर येथीलच निदा असीफ शमशेद (१०) ही मुलगीदेखील कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. त्या दोघींवर बेळगाव सिव्हील इस्पितळात उपचार सुरू आहेत.
दोन दिवसांपूर्वीच निट्टूर येथील कॉलेज तरूणीवर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. तिच्यावरही उपचार सुरू आहेत. खानापूर शहरातील एका उपनगरात राहत असलेल्या परप्रांतीयांच्या मुलाचा कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली आहे.

काम चालू, रस्ता बंद; व्यवहरार झाले थंड
समांतर क्रांती / खानापूर गेल्या दोन महिन्यापासून खानापूर-अनमोड मार्ग बंद करण्यात आला आहे. आजपासून (ता.२२ मार्च) हा रस्ता वाहतुकीस खुला केला जाणार होता, पण कंत्राटदाराच्या वेळकाढूपणामुळे पुढील महिनाभर तरी हा रस्ता वाहतुकीस बंदच राहणार असल्याचा अंदाज आहे. खासदारांच्या दुर्लक्षामुळेच कामास दिरंगाई होत असल्याचा आरोप यादरम्यान काँग्रेसचे या भागातील नेते ईश्वर बोबाटे यांनी केला आहे. रेल्वे […]