समांतर क्रांती / खानापूर
Khanapur: A youth was kidnapped and brutally beaten. क्षुल्लक कारणावरून एका तरूणाचे अपहरण करून बेदम मारहाण करीत खूनाचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील देवलत्ती येथे घडली आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद झाला असून संशयीत फरारी आहेत.
कांही दिवसांपूर्वी देवलत्ती येथील तरूणावर अपशब्द वापरल्याचा आळ घेत दोघांनी त्याला त्याच्या घरी जाऊन मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पण, सदर तरूण घरी नव्हता. सायंकाळी तो घरी आल्यानंतर त्याचे अपहरण करून त्याला अज्ञातस्थळी घेऊन जाऊन बेदम मारहाण करण्यात आली. त्यात हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. त्या दोघांनी आपला खून करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार सदर जखमी तरूणाने खानापूर पोलिसात नोंदविली आहे. यासंदर्भात गुन्ह नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, एका संघटनेचे पदाधिकारी असलेले दोघे संशयीत गेल्या तीन दिवसांपासून फरारी आहेत. त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. या घटनेतील संशयीतांनी गुंडागर्दी चालविल्याची चर्चा असून त्यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा निर्णय व्यक्त करण्यात आला आहे.
बेळगाव होणार ‘सेफ सिटी’
बंगळूर: केंद्राच्या सेफ सिटी (सुरक्षित नगर) योजना राज्यातील ५ महानगरांत राबविण्याचा प्रस्ताव राज्य सरकारेन केंद्राकडे पाठविला आहे. यामध्ये बेळगावचा देखील समावेश असून बेळगावची निवड झाल्यास महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासह सबलीकरणासाठी २०० कोटींचा निधी मंजूर होणार आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात बंगळूर महानगराची निवड करून सेफ सिटी योजना राबविली होती. आता राज्य सरकारने बेळगावसह मंगळूर, म्हैसूर, हुबळी-धारवाड […]