
समांतर क्रांती / खानापूर
राजश्री कुडची या निवृत्त झाल्यानंतर खानापूरच्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचा कार्यभार समूह संपन्मूल अधिकारी अशोक अंबगी यांच्याकडे आला आहे. मात्र, नेहमीप्रमाणचे कार्यालयाचा ‘कारभार’ बहुचर्चीत शिक्षकाकडेच आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात अंदाधुंदी माजली असून शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांत नाराजी पसरली आहे. तर कांही दलाल शिक्षकांची मात्र चंगळ चालली आहे. स्वत: या क्षेत्रात कार्यरत राहून निवृत्त झालेले आमदार विठ्ठल हलगेकर यांनी या खात्याच्या का दुर्लक्ष केले आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.
राजश्री कुडची यांच्या कार्यकाळात शैक्षणिक दर्जा पूरता खालावला आहे. त्यांचा शिक्षकांवर अजिबात वचक न राहिल्यामुळे शिक्षक नाक्यावर, विद्यार्थी वाऱ्यावर अशी तालुक्यातील स्थिती राहिली आहे. शिक्षण खात्याने गैरव्यवहारांचा कळस गाठला असून शिक्षकांना सुध्दा त्यांच्या कामासाठी अधिकाऱ्यांचे खिसे गरम करावे लागत आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी विभागवार दलालांची नियुक्तीच करण्यात आली असून त्यांचे नेतृत्व कार्यालयातील एक शिक्षकच करीत आहे.
सदर शिक्षक हा या कार्यालय अनेक वर्षांपासून अधिकाऱ्याचा तोरा मिरवीत असून तोच येथे येणाऱ्या प्रत्येक शिक्षणाधिकाऱ्याचा हस्तक बनतो. त्याच्या मांडीला मांडी लावून बसणारे त्यांच्या निर्देशानुसार ‘वसुली’चे काम करतात. तर हा अधिकारी शिक्षक जणू बुक्की बनला आहे. वसुली आणि लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘मॅनेज’ करण्याची कला या ‘गोडबोल्या’ शिक्षकाला अवगत असल्याने येणारे सगळे शिक्षणाधिकारी सुध्दा त्याला महत्व देतात.
आता शिक्षणाधिकारी कार्यालयाचा कार्यभार जरी अशोक अंबगी यांच्याकडे असला तरी ‘कारभार’ मात्र त्या शिक्षकाकडेच आहे. या खात्याला सध्या कुणीच वाली नसल्याने कुडची यांच्या कार्यकाळात शिल्लक असलेल्या वेतनाच्या बिलांसाठी वसुलीचे काम तेजीत असल्याची चर्चा आहे. या एकंदर प्रकाराला शिक्षकांकडून विरोध आवश्यक असला तरी शिक्षकच कामात कसूर करीत असल्याने ‘आम्ही सगळे भाऊ-भाऊ, मिळेल ते वाटून खाऊ’ असा प्रकार सुरू आहे.
गुरुजी जरा लक्ष द्या की.. खानापूरला शिक्षणाधिकारी म्हणून येण्यासाठी अनेकांनी लॉबींग चालविले आहे. आता राजकीय हस्तक्षेपामुळे यात रंगत आली आहे. तालुक्याचा कारभारच सध्या ‘कारभारीं’च्या जीवावर चालला आहे. असे असतांना ‘सोहळे’ साजरे करण्यात गुंतलेले आमदार विठ्ठल हलगेकर यांना तालुक्यातील समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असेच त्यांच्या वर्तणुकीतून दिसून येत आहे. गुरूजी जरा तालुक्याकडेही लक्ष द्या, अशी मागणी नागरीकांतून होत आहे.

मंत्री हेब्बाळकरांचा अपघात कँटरने धडक दिल्यानेच..
समांतर क्रांती / बेळगाव महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाहनाचा अपघात कंटेनरने धडक दिल्यानेच झाला असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी स्पष्ट केले आहे. हा पूर्वनियोजीत कट नाही, असेही ते म्हणाले असले तरी आता या अपघाताबाबत शंका-कुशंकाना ऊधाण आले आहे. काल मंगळवारी (ता.१४) सकाळी ६ च्या सुमारास हा अपघात झाला […]