समांतर क्रांती वृत्त
खानापूर: राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शिक्षण सचिवांनी बदल्यांच्या यादीला मंजुरी दिली आहे. शनिवारी (ता.०१) सायंकाळपर्यंत यासंदर्भातील अंतिम आदेश दिला जाणार आहे. खानापूरच्या क्षेत्रशिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडची यांचीही बदली झाली असून त्यांच्या जागी बेळगावचे क्षेत्रशिक्षणाधिकारी वाय. जे. बजंत्री यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. शुक्रवारी ही प्रक्रिया तातडीने करण्यात आली असून बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारीपदी ए.बी.पुंडलीक यांची वर्णी लागली आहे.
हृदयद्रावक दुर्घटना: बसला लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
An incident has taken place near Buldhana where 25 passengers died after the bus caught fire after an accident. समांतर क्रांती वृत्त बुलढाणा: महाराष्ट्रातील बुलढाण्याजवळ लग्नासाठी निघालेल्या बसला अपघातानंतर लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात समृध्दी महामार्गावर रात्री १.३५ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे, या बसमध्ये एकूण ३३ […]