समांतर क्रांती / खानापूर
खानापूर को-ऑप बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळासाठी आज रविवारी (ता.१२) मतदान होणार आहे. विद्यमान संचालकांचे सहकार पॅनेल विरुध्द बँक विकास पॅनेल अशी झुंज होईल, यात कोण बाजी मारणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी चारपर्यंत मतदानाची प्रक्रीया पार पडेल, त्यानंतर मतमोजणी होणार असून उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
विद्यमान संचालकांच्या सहकार पॅनेलने बँकेच्या विकासाच्या मुद्दावर भर दिला आहे. तर विकास पॅनेलने गैरव्यवहाराचा मुद्दा समोर करून मतयाचना केली. संचालकांनी नोकरभरतीत मोठा गैरव्यवहार केला असल्याचा विकास पॅनेलचा आरोप सहकार पॅनेलने खोडून काढतांना नोकर भरती पारदर्शक झाली असून ती कायदेशीर असल्याचे म्हटले आहे.
बँकेच्या एकुण १३ जागांसाठी मतदान होणार आहे. सामान्य गटातून सात, महिला गटातून दोन तर मागास अ, मागास ब वर्ग तसेच अनुसुचीत जाती आणि अनुसुचीत जमाती गटातून प्रत्येकी एक जागेसाठी मतदार होईल. विद्यमान संचालकांच्या सहकार पॅनेलमधून विद्यमान संचालक मारूती खानापुरी आणि शिवाजी पाटील हे संचालक बाहेर पडले. तसेच अनुसुचीत जमात गटातून शिवाप्पा पाटील यांच्या जागी त्यांचा मुलगा राजकुमार पाटील हेदेखील विकास पॅनेलमध्ये दाखल झाले आहेत.
सहकार पॅनेलने विठ्ठल निंगाप्पा गुरव, मारूती अप्पुसिंग बिलावर आणि अनिल शिवाजी बुरूड यांना त्या जागी संधी दिली आहे. सहकार पॅनेलचे नेतृत्व अमृत महादेव शेलार तर विकास पॅनेलचे नेतृत्व बाळासाहेब महादेव शेलार हे करीत आहेत. त्यामुळे ही निवडणूक शेलारविरुध्द म्हणूनच रंगतदार ठरली आहे. दोन्ही भावांचा या निवडणुकीत कस लागणार आहे.
अमृत शेलार यांनी बँकेत नव्याने अनेक योजना राबविल्या आहेत. अनेक योजनांची आखणी त्यांनी केली आहे. भविष्यात सभासदांना ते आधुनिक बँकेचा अनुभव देण्यास सज्ज झाले आहेत. बँकेचा विस्तार करून त्यांनी व्यवहारवृध्दी चालविली आहे. तसेच सेफ डिपॉझिट लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन सर्व्हीस देण्याची सज्जतादेखील त्यांनी केली आहे. बँकेचे अनुभवी संचालक त्यांच्या पाठीशी अअहेत. विशेष म्हणजे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील त्यांच्यासमवेत असल्याने त्यांना विजयाची खात्री आहे. बँकेच्या आगामी विकासाचा आराखडा त्यांनी मतदारांसमोर मांडला असल्याने मतदारांनाही त्यांना विजयी करण्याबाबत अश्वस्त केले आहे.
विकास पॅनेलचे बाळासाहेब शेलार यांच्याबद्दल जनसामान्यात आदराचे स्थान आहे. त्यांचा लोकसंपर्क चांगला आहे. त्या बळावरच त्यांनी यावेळी गैरव्यवहाराचा मुद्दा समोर करून निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी पॅनेल उभे केले आहे. त्यांच्या समवेत माजी चेअरमन दिवंगत बाबुराव चित्रगार, कृष्णा खानापुरी, शिवाप्पा पाटील यांचे वारसदार उमेदवार म्हणून आहेत. तसेच शिवाजी पाटील हे विद्यमान संचालकदेखील त्यांच्या पॅनेलचे उमेदवार आहेत. बँकेत गैरव्यवहार झाला असून तो रोखण्यासाठी मतदार या पॅनेलच्या उमेदवारांना विजयी करतील, असा विश्वास बाळासाहेब शेलार यांना वाटतो.
या दोन्ही पॅनेलव्यतिरिक्त चंद्रकांत देसाई आणि परशराम करंबळकर हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांना मतदार कितपत साथ देतात, हे निकालानंतरच कळेल. तुर्तास खरी लढत ही दोन्ही पॅनलमध्येच होणार असून केवळ कांही तासातच मतदान प्रक्रीया पार पडून निकाल हाती येतील.
दोन ‘इन’ दोन आऊट..
सहकारी संस्थांच्या निवडणुकांत सत्तांतर होणे तसे अवघडच असते. त्यामुळे आज होणाऱ्या निवडणुकीत खानापूर को-ऑप बँकेत नव्या पॅनेलला कितपत मतदारांचा प्रतिसाद लाभेल, याबाबत शंकाच आहे. पण, एकंदर स्थिती पाहता विकास पॅनेलमधील दोघांना बँकेचे संचालक होण्याचा मान मिळेल. तर सहकार पॅनेलमधील दोघांना नारळ मिळेल, असा अंदाज आहे.
यस्सऽऽ वुई कॅन..!
समांतर क्रांती / युवा दिन विशेष ‘गिव्ह मी हंड्रेड युथ, आय वील चेंज द व्होल वर्ल्ड इन टू हेव्हन’ हे वाक्य वाचलं की हमखास डोळ्यासमोर येतात ते स्वामी विवेकानंद.पोरसवदा वयात अपार बुध्दीमत्ता बाणवलेले स्वामी विवेकानंद याच देशात होऊन गेले का? असा प्रश्नही सध्याच्या वर्तमानात विचारवंताकडून विचारला जातो. त्याबरोबर देशाच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह उभे केले जाते. तरूणांचा […]